कोचिंग क्लासेसवर आयकरच्या धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:24 IST2017-09-26T00:24:53+5:302017-09-26T00:24:53+5:30
शहरातील बाबानगर परिसरात असलेल्या कोचिंग क्लासेसवर सोमवारी आयकर विभागाच्या पथकाने धाडी मारल्या़ यावेळी तब्बल २५ कर्मचाºयांचे पथक कोचिंग क्लासेसच्या व्यवहाराची तपासणी करीत होते़

कोचिंग क्लासेसवर आयकरच्या धाडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील बाबानगर परिसरात असलेल्या कोचिंग क्लासेसवर सोमवारी आयकर विभागाच्या पथकाने धाडी मारल्या़ यावेळी तब्बल २५ कर्मचाºयांचे पथक कोचिंग क्लासेसच्या व्यवहाराची तपासणी करीत होते़
शहरातील बाबानगर भागात असलेल्या खाजगी कोचिंग क्लासेसने नोटाबंदीच्या काळात मोठ्या रकमेचे व्यवहार केल्याची व विद्यार्थीसंख्या कमी दाखवित आयकर बुडविल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती़ त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाºयांनी सोमवारी सकाळी एकाच इमारतीत चालणाºया चार कोचिंग क्लासेसवर धाड टाकली़ यावेळी कोचिंग क्लासेसमध्ये असलेली विद्यार्थीसंख्याही पडताळून पाहण्यात आली़ त्याचबरोबर कोचिंग क्लासेसने नोटाबंदीच्या काळात केलेल्या व्यवहाराची तपासणी करण्यात आली़ यावेळी आयकर विभागाचे तब्बल २५ कर्मचारी उपस्थित होते़ विशेष म्हणजे यापूर्वीही आयकर विभागाच्या पथकांनी शहरातील नामांकित कोचिंग क्लासेसवर धाडी मारल्या होत्या़
सोमवारच्या धाडीची माहिती मिळताच शहरातील इतर अनेक खाजगी कोचिंग क्लासेसचालकांनी त्वरित आपले क्लास बंद केले़