आयकर निरीक्षकाचे निवासस्थान फोडले

By Admin | Updated: December 3, 2015 00:31 IST2015-12-03T00:13:55+5:302015-12-03T00:31:21+5:30

जालना : येथील टी.व्ही. सेंटर परिसरातील आयकर कार्यालयातील निरीक्षक नंदकिशोर मिश्रा यांचे शासकीय निवासस्थान चोरट्यांनी फोडून १४ हजार ३०० रूपयांचे साहित्य चोरून नेले.

The Income Tax Inspector's house was demolished | आयकर निरीक्षकाचे निवासस्थान फोडले

आयकर निरीक्षकाचे निवासस्थान फोडले


४१५ दिवसांनंतर दिली तक्रार: १४ हजारांचा माल लंपास
जालना : येथील टी.व्ही. सेंटर परिसरातील आयकर कार्यालयातील निरीक्षक नंदकिशोर मिश्रा यांचे शासकीय निवासस्थान चोरट्यांनी फोडून १४ हजार ३०० रूपयांचे साहित्य चोरून नेले. विशेष म्हणजे याप्रकरणी तब्बल १५ दिवसानंतर मिश्रा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने बुधवारी तालुका जालना पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयकर कार्यालया परिसरातच आयकर निरीक्षक मिश्रा यांचे निवासस्थान आहे.
१५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान ते आपल्या निवासस्थानाला कुलूप लावून धार्मिक कार्यक्रमांसाठी बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच घरातील इन्व्हर्टर, बॅटरी, संगणकाचे साहित्य मिळून १४ हजार ३०० रूपयांचे साहित्य चोरून नेले. या चोरीप्रकरणी बुधवारी तालुका जालना पोलिस ठाण्यात मिश्रा यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पठाडे हे करीत असल्याची माहिती ठाणेअमंलदार एम.यु. पठाण यांनी दिली. (प्रतिनिधी)
ट्रकच्या धडकेत दोन वीज खांबांचे नुकसान
जालना : भरधाव ट्रकने दोन वीज खांबांना धडक दिल्याने त्यात ५४ हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड चौफुलीवर भरधाव ट्रक (एम.एच. १४- ए.एस. ६६११) ने दोन खांबाना बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास धडक दिली.
त्यात खांबाचे ५४ हजार ८०० रूपयांचे नुकसान झाले. अशी तक्रार सहाय्यक अभियंता रोहिदास बरगवाल यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात दिल्याने ट्रक चालक अ. कदीर. अ. रहिम (रा. दर्गारोड काद्राबाद परभणी ) विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The Income Tax Inspector's house was demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.