कुक्कूटपालनातून घेतले लाखाचे उत्पन्न
By Admin | Updated: August 17, 2014 00:05 IST2014-08-17T00:05:00+5:302014-08-17T00:05:00+5:30
बीड : शिक्षण घेऊन आपल्या मुलाने सरकारी नोकरदार बनावं, असे घरच्यांचे स्वप्न होते. मात्र हे स्वप्न न पेलल्यामुळे आई-वडील खुप नाराज झाले. घरचे नाराज झालेल्याची जाणीव

कुक्कूटपालनातून घेतले लाखाचे उत्पन्न
बीड : शिक्षण घेऊन आपल्या मुलाने सरकारी नोकरदार बनावं, असे घरच्यांचे स्वप्न होते. मात्र हे स्वप्न न पेलल्यामुळे आई-वडील खुप नाराज झाले. घरचे नाराज झालेल्याची जाणीव त्याला झाली आणि त्याने स्वत:च्या हिमंतीवर कुक्कूटपालणाचा व्यवसाय उभारला. यामध्ये त्याला यशही आले आणि अवघ्या सहा महिन्यामध्ये त्याने लाखाचे उत्पन्न काढले.
कालीदास रमेश आजबे हा मुळचा वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवाशी. प्राथमिक शिक्षण गावात झाल्यांनतर इंजिनीअरींगचे शिक्षण जिल्ह्याचे ठिकाणी घेतले. काही कारणास्तव शिक्षणामध्ये कमी गुण मिळाले. याचा परिणाम घरच्यांवर आणि कालीदासवरही झाल्याचे स्पष्ट दिसून येत होते. घरच्यांचे रोजचे चिडणे, भांडणे असे प्रकार घडत राहिले. कालीदास हा संस्कारीत मुलगा असल्याने त्याला या सर्व गोष्टींची जाणीव होती. त्यामुळे त्याला घरच्यांचे बोलणे लागले. त्याने वर्षापूर्वी कुक्कूटपालण व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल असणे आवश्यक होते. यासाठी इतरांपुढे हात पसरण्यापेक्षा कालीदासने आपल्या वडीलांकडेच मदत मागितली. वडीलांनी नकार दिला. मात्र आईने मध्यस्थी करीत कालीदासला ३० हजार रुपये दिले.
यामध्ये त्याने सुरूवातीला ७०० गावरान कोंबड्या खरेदी केल्या. आता यांच्यामध्ये वाढ होऊन दीड हजारांजवळ कोंबड्यांची संख्या पोहचली आहे. वडीलांचे पैसे तर परत केलेच शिवाय लाख रुपयांचे उत्पन्नही वडीलांच्या हातावर ठेवले. सध्या या कोंबड्या व अंडे हे लोकल मार्केटला जात असल्याचे कालीदासने सांगितले. महिन्यातून तीन वेळेस कोंबड्यांना लसही दिली जाते. धनंजय कुलकर्णी, अंकूश आजबे यांच्या सहकार्यानेही हा व्यवसाय पुढे जात आहे. शासनाकडून काही तरी अनूदान मिळावे, अशी कालिदासची अपेक्षा आहे. कालिदासने सुशिक्षीत बेरोजगारांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्याचे कौतूक होत आहे. (वार्ताहर)