शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मिरचीवर कोकडा, चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी पीक उपटली, खर्चही गेला वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 19:55 IST

शेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली. यासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला.

- केशव पवारबनकिन्होळा : सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह परिसरातील मिरची पिकावर कोकडा, चुरडा, मुरडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक वाळत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. नाइलाजाने हे पीक शेतकरी उपटून फेकत असल्याचे चित्र शेत-शिवारात पाहावयास मिळत आहे.

सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा, बाभूळगाव बु., निल्लोड, चिंचखेडा, भवन, तलवाडा, भायगाव, वरखेडी, गेवराई सेमी, कायगाव, गव्हाली आदी शेत-शिवारातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून उन्हाळी मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मागील वर्षी मिरचीला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी एप्रिल महिन्यात मिरची पिकाची जेमतम पाण्यावर मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. तालुक्यात गेल्या वर्षी ३ हजार ६०० हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आली होती. यावर्षी ८ हजार २१२ हेक्टरवर लागवड करण्यात आली. असे असले तरी या पिकावर मोठ्या प्रमाणात कोकड, चुरडा - मुरडा आदी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. 

या विषाणूजन्य रोगामुळे झाडाच्या शेंड्याकडील कोवळी पाने पिवळसर पडून वेडीवाकडी वरखाली वळलेली दिसत आहेत. रोगग्रस्त झाडाला फुले कमी लागत आहेत किंवा फुले लागणेसुद्धा बंद झाले आहे. फळे लागली तरी ती कमी आकाराची दिसत असून झाडाची वाढ खुटत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले असून या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी विविध रासायनिक द्रव्याच्या फवारण्या केल्या; परंतु त्याचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे वैतागलेले शेतकरी आता शेतातील हे पीक उपटून फेकत आहेत. याबाबत भायगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर भगत म्हणाले, मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नाइलाजाने हे पीक उपटून फेकावे लागले. आता रिकाम्या झालेल्या शेतात मका व कोबीची लागवड सुरू केली आहे. मिरची लागवडीत झालेले नुकसान यातून भरून निघेल, अशी अपेक्षा आहे, असे भगत म्हणाले.

लागवडीसाठी ७० ते ८० हजारांचा खर्चशेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली. यासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला. मिरची पिकावर औषध फवारणीचा खर्च वेगळा करावा लागला; परंतु आता या पिकावर कोकडा, चुरडा, मुरडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक उपटून फेकावे लागत आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीसाठी आणि औषधी फवारणीसाठी केलेला खर्चही वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी