जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
By Admin | Updated: May 8, 2016 23:34 IST2016-05-08T23:14:57+5:302016-05-08T23:34:46+5:30
जालना : जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील शिराळासह अकोलादेव व परिसर तसेच परतूर शहर व परिसरात रविवारी दुपारी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली

जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
जालना : जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील शिराळासह अकोलादेव व परिसर तसेच परतूर शहर व परिसरात रविवारी दुपारी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या पावसाने परिसरातील वातावरण गारवा निर्माण झाला होता. तर अकोलादेव येथे वीज कोसळून बैल दगावला.
जाफराबाद तालुक्यातील शिराळासह परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
अर्धातास पडलेल्या या पावसाने अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले होते. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, दुपारी अकोला देव येथे वीज कोसळून बैल ठार झाल्याची घटना घडली.
तर परतूर शहर व परिसरात सायंकाळी ५ च्या सुमारास मेघगर्जना व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. कडाक्याचे ऊन व वातावरणातील उष्णता यामुळे सर्वच हैराण आहेत.
या अचानक झालेल्या पावसाने काही काळ उष्णतेपासून सुटका झाली. हा पाऊस सतत अर्धा तास पडत असल्याने काही भागात पाणीही साचले होते. (प्रतिनिधी)
अकोला देव : जाफराबाद तालुक्यातील अकोला देवसह परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास पडलेल्या विजेमुळे येथील शेतकरी रमेशअप्पा तातेअप्पा यांच्या एक बैल वीज पडून ठार झाला. दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच विजेचा मोठ्या प्रमाणात कडकडाट सुरू होता.
४पंधरा ते वीस मिनिटे विजांचा कडकडाट झाल्याने मशागतीचे कामे करणारे शेतकरीही शेतातून परत येत असल्याचे दिसून आले. रमेश अप्पा यांच्या घरासमोर बांधलेल्या बैलावर वीज पडून बैल जागीच ठार झाला. त्यांचे ३५ हजार रूपयांचे नुकसान झाले.
४सदर घटनेचा तलाठी खंदारे , रत्नाकर भोरजे यांनी पंचनामा केला. झालेल्या नुकसानीचे अकस्मात निधीतून शासनाने भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ही घटना घडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.