जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस
By Admin | Updated: March 17, 2017 00:25 IST2017-03-17T00:23:32+5:302017-03-17T00:25:45+5:30
लातूर : दिवसभराच्या उघडीपीनंतर गुरुवारी रात्री ६ वाजल्यानंतर लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला.

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस
लातूर : दिवसभराच्या उघडीपीनंतर गुरुवारी रात्री ६ वाजल्यानंतर लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. औसा तालुक्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. तालुक्यातील नागरसोगा परिसरातही अवकाळी व गारांचा पाऊस झाला.
आलमला, किल्लारी परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर उन्हाचे चटके जाणवत होते. उकाडा आणि त्यानंतर रात्री ६ वाजता वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस झाला. किल्लारी येथे १० मिनिटे तर आलमला येथे १५ मिनिटे अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या.
औसा तालुक्यात बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे ११ जण जखमी झाले आहेत. तर गाय, म्हैस, शेळ्या अशी एकूण ८ जनावरे दगावली आहेत. (प्रतिनिधी)