जयभीम महोत्सवात भरगच्च कार्यक्रम
By Admin | Updated: April 2, 2017 23:32 IST2017-04-02T23:28:55+5:302017-04-02T23:32:24+5:30
बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षीपमाणे यावर्षीही सार्वजनिक जयंती समितीतर्फे जयभीम महोत्सव पार पडत आहे

जयभीम महोत्सवात भरगच्च कार्यक्रम
बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षीपमाणे यावर्षीही सार्वजनिक जयंती समितीतर्फे जयभीम महोत्सव पार पडत आहे. रविवारपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली असून १४ एप्रिलपर्यंत भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
रविवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. जयभीम महोत्सवादरम्यान ४ एप्रिल रोजी तुलशी इंग्लिश स्कूल येथे सकाळी १० वा. महापुरूष सामान्य ज्ञान स्पर्धा, ८ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी १० ते ५ पर्यंत आरोग्य तपासणी शिबिर तर सायकांळी ६.३० वा. भदंत सुमेध बोधी यांची धम्मदेसना, ९ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी १० ते ५ पर्यंत भिमगीत गायन स्पर्धा तर ६.३० वा. प्रा. नंदाताई फुकट यांचे व्याख्यान, १० एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी ११ वा. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन तर सायंकाळी ६.३० वा. रामराव गवळी यांचे व्याख्यान, ११ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी ८ वा. राष्ट्रपिता महात्मा फुले यांना अभिवादन तर सकाळी ११ ते दुपारी २ कवि संमेलन व सायंकाळी ६.३० वा. प्रो. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचे व्याख्यान, १२ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी ११ वा. उद्योजकता मार्गदर्शन तर सायंकाळी ६.३० वा. रवींद्र जोगदंड यांचे व्याख्यान, १३ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सायंकाळी ६.३० वा. प्रख्यात गायक आनंद शिंदे यांचा भीमगीत संगीत रजनी कार्यक्रम तर १२ वा. शिवाजी महाराज पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत समता ज्योत मिरवणूक, १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत प्रभात फेरी व अभिवादन कार्यक्रम तर सायंकाळी ६ वा. शिवाजी महाराज पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे. (प्रतिनिधी)