रोटरी एलिट औरंगाबादचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:03 IST2021-07-10T04:03:52+5:302021-07-10T04:03:52+5:30
वाईच्या डीजीएन स्वाती हेरकल या अध्यक्षस्थानी होत्या. रोटरीच्या अध्यक्षपदाचा स्वाती स्मार्त, तर सचिव पदाचा उज्वल बोरोले यांनी ...

रोटरी एलिट औरंगाबादचा पदग्रहण सोहळा
वाईच्या डीजीएन स्वाती हेरकल या अध्यक्षस्थानी होत्या. रोटरीच्या अध्यक्षपदाचा स्वाती स्मार्त, तर सचिव पदाचा उज्वल बोरोले यांनी पदभार स्वीकारला. स्वाती स्मार्त यांनी त्यांचे या वर्षातील कामाचे नियोजन सांगितले. माजी अध्यक्ष अशोक मतसागर यांनी त्यांच्या कार्यकाळात कोरोनासंदर्भात घेतलेल्या उपक्रमांची माहिती सांगितली. ए. जी. रोटे, रागिणी यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली तसेच डी. जी. ओमप्रकाश मोतीपावले यांनी शुभेच्छा दिल्या. सचिव बोरोले यांनी आभार मानले. मंचावर पीडीजी सुहास वैद्य यांची विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन दीपाली कुलकर्णी यांनी केले. सुनीता बाजपेयी, अभय स्मार्त, विवेक कानडे, भालचंद्र अत्रे, अशोक मतसागर, चंद्रकांत बहिवाल, हसमुख सोमय्या, उत्तम शिरसाट, सुधीर कुलकर्णी, सुनीता वैद्य, मंजू अत्रे, लता सोमय्या, डॉ. अंजली नाईक, डॉ. अंजली भालचंद्र, जयश्री कानडे, सुजाता अवचट, दीपाली कुलकर्णी, दीपाली बोरोले, सविता मतसागर यांनी यावेळी पदभार स्वीकारला.