कार्डियाक केअर सेंटरचे उद्घाटन

By Admin | Updated: August 31, 2014 00:42 IST2014-08-31T00:29:50+5:302014-08-31T00:42:34+5:30

औरंगाबाद : कार्डियाक केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले.

Inauguration of the Cardiac Care Center | कार्डियाक केअर सेंटरचे उद्घाटन

कार्डियाक केअर सेंटरचे उद्घाटन

औरंगाबाद : लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद क्लासिक व सुमनांजली नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या कार्डियाक केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. हृदयविकारासंदर्भातील ईसीजी टेस्ट करणाऱ्या रुग्णांसाठी या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद क्लासिकच्या वतीने नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. असाच एक उपक्रम क्लबच्या वतीने राबविण्यास सुरूवात झाली असून हृदयविकाराच्या रुग्णांना स्वस्तात ईसीजी रिपोर्ट देण्यात येऊन आजाराविषयीचे आॅनलाईन निदान केले जाणाार आहे. बंगळुरू येथील नारायणा हृदयालयाशी टायअप करून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रकल्पप्रमुख मिलिंद दामोधरे यांनी सांगितले.
ज्या रुग्णांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांना या उपक्रमांतर्गत ४०० रुपयात मिळणारा ईसीजी रिपोर्ट फक्त ५० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच आॅनलाईन मोडेम इन्स्ट्र्युमेंटद्वारे बंगळुरू येथील नारायणा हृदयालयाचे हृदयविकारतज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णाच्या उपचारासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. गरजू व गरीब रुग्णांसाठी हा उपक्रम अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना ना. राजेंद्र दर्डा यांनी लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद क्लासिक व सुमनांजली नर्सिंग होमचे अभिनंदन केले. हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असून रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे. बंगळुरू येथील हृदयविकारतज्ज्ञांकडून रुग्णांना आॅनलाईन पद्धतीने उपचार मिळणार असल्याने रुग्णांना शहरातच अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम शहरात राबविण्यात येत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना. दर्डा यांनी उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
सुमनांजली नर्सिंग होम येथे पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद क्लासिकचे अध्यक्ष ला. किरण पहाडे, सचिव ला. भाऊसाहेब गवळी, कोषाध्यक्ष ला. राजेंद्र जैन, प्रकल्प प्रमुख ला. मिलिंद दामोधरे, डॉ. डेव्हिड, डॉ. मिलिंद देशपांडे, ला. राजेश राऊत, ला. तनसुख झांबड, ला. महावीर पाटणी, ला. एम.के. अग्रवाल, ला. रवींद्र खिंवसरा, ला. शांतीलाल छापरवाल, ला. सुनील ठोळे, ला. जितेंद्र संघवी, ला. दीपक मुंदडा, ला. गिरीश पांडे, ला. संदीप डोडल, शिरीश कंदी आदींसह क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होती.

Web Title: Inauguration of the Cardiac Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.