शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

'मिलिंद'च्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा चकाकले बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेले अजिंठा हॉस्टेल

By राम शिनगारे | Updated: June 20, 2024 19:37 IST

ऐतिहासिक मिलिंद महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला सुरुवात; स्थापनेपासून पहिल्यांदाच नागसेनवनातील ऐतिहासिक अजिंठा वसतिगृह पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले

छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे उघडण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भव्यदिव्य अशा मिलिंद महाविद्यालयाची नागसेनवनात १९ जून १९५० राेजी सुरुवात केली. हे महाविद्यालय बुधवारी (दि.१९) अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या ऐतिहासिक मुलांचे अजिंठा वसतिगृहाचे पहिल्यांदाच यानिमित्त नूतनीकरण होत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, मुलींचे प्रज्ञा वसतिगृह आणि लुंबिनी नाट्यगृहाचीही दुरुस्ती होणार आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी ५४ एकर परिसरामध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या निर्मितीस सुरुवात केली. डॉ. आंबेडकर यांनी स्वत:च्या देखरेखीखाली इमारती उभ्या केल्या. त्यातील प्रत्येक वास्तू ऐतिहासिक आहे. मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेला ७४ वर्षे पूर्ण होऊन अमृतमहोत्सवी वर्षात १९ जून २०२४ रोजी महाविद्यालय प्रवेश करीत आहे. या ७४ वर्षांच्या कालावधीत हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारे उघडणाऱ्या महाविद्यालयातील ऐतिहासिक अजिंठा वसतिगृहाची दुर्दशा झाली होती. मात्र, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांनी पाठपुरावा करीत वसतिगृहांच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार २ कोटी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून ३ ऑक्टाेबर २०२३ रोजी अजिंठा वसतिगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. आठ महिन्यांत वसतिगृहांच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्याशिवाय मुलींचे प्रज्ञा वसतिगृह आणि लुंबिनी नाट्यगृहाचीही दुरुस्ती लवकरच केली जाणार आहे. त्यासाठी काही निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे.

मिलिंद समता रॅली आज निघणारअमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पणाच्या निमित्ताने बुधवारी (दि.१९) सकाळी ८ वाजता 'मिलिंद समता रॅली'चे आयोजन केले आहे. लुंबिनी उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही रॅली निघेल. मिल कॉर्नर, औरंगपुरा, गुलमंंडी, सिटीचौकमार्गे भडकल गेट येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुन्हा मिलिंद महाविद्यालयात रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थी, आंबेडकरी विचारांचे अनुयायी, बौद्ध धम्माचे उपासक-उपासिका, प्रतिष्ठित नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी केले आहे.

वाढीव निधीसाठी प्रस्तावमिलिंद महाविद्यालयातील अजिंठा वसतिगृह, मुलींचे प्रज्ञा वसतिगृह आणि लुंबिनी नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यासाठी निधी अपुरा पडत असून, वाढीव निधी राज्य शासनाने उपलब्ध करून द्यावा, यासाठीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याचा पाठपुरावा महाविद्यालयाकडून करण्यात येत आहे.- डॉ. वैशाली प्रधान, प्राचार्य, मिलिंद महाविद्यालय

टॅग्स :Nagsen vanनागसेन वनAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर