शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

राज ठाकरेंच्या सभेत लोकं नक्कल पाहायला जातात: चंद्रकांत खैरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 17:33 IST

''राज ठाकरे यांना मी चांगले ओळखतो. त्यांची कधीतरी हवा येते नंतर सहा महिन्यानंतर गायब होते.''

औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेने कोणतेही वातावरण बदलणार नाही. येथील वातावरण विक्रमी सभेने केवळ बाळासाहेब ठाकरे यांनी बदलले होते. आता कोणात हिंमत नाही. राज ठाकरे यांना मी चांगले ओळखतो, त्यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आहे. पण लोकं त्यांच्या सभेला नक्कल पाहण्यासाठी येतात. याचा कसलाच परिणाम शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर होणार नाही, अशी रोखठोक भूमिका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज मांडली.

'मशिदीवरील भोंगा हटाव' मोहीम हाती घेतल्यानंतर राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे १ में रोजी सभा होणार आहे. या सभेच्या आयोजनावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. ही सभा आमचा जुना मित्र भाजपने स्पॉन्सर केलेली आहे. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतली आणि वातावरण बदले. बाकी कोणात ही हिंमत नाही. शिवसेनेला त्यांच्या सभेवरून काही देणघेण नाही. त्यांनी सभा घ्यावी, छोटी घ्यावी, मोठी घ्यावी , बाहेरून माणसे आणावीत. याने शिवसेनच्या बालेकिल्ल्यात काही फरक पडत नाही, असा ठाम विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.

भाजपने स्पॉन्सर केले

राज ठाकरे यांना मी चांगले ओळखतो. त्यांची कधीतरी हवा येते नंतर सहा महिन्यानंतर गायब होते. नंतर पुन्हा कधी तरी हवा येते. शिवसेनेने  विकासावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली. भाजप सत्तेत परत येऊ शकत नाही. यामुळे जळफळाट करून त्यांनी एमआयएमनंतर मनसेला स्पॉन्सर केले आहे. शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न आहे, मात्र यामुळे आम्ही अधिक बळकट होऊ असेही खैरे म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादMNSमनसेChandrakant Khaireचंद्रकांत खैरे