शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
3
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
4
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
5
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
6
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
7
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
8
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
9
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
10
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
11
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
12
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
13
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
14
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
15
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
16
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
17
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
18
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
19
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
20
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
Daily Top 2Weekly Top 5

मुकुंदवाडीत ५०० पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेचा २२९ अतिक्रमणांवर बुलडोझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:53 IST

७ तास सलग चाललेल्या कारवाईत २२९ कच्ची, पक्की अतिक्रमणे भुईसपाट

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीत शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता महापालिका, पोलिसांनी मिळून संयुक्तरीत्या अतिक्रमणांवर कारवाई केली. ७ तास सलग चाललेल्या कारवाईत २२९ कच्ची, पक्की अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली. या भागात भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

मुकुंदवाडी स्मशानभूमीच्या बाजूला एका हॉटेलसमोर गुरुवारी रात्री ८:०० वाजता मटण विक्रेत्याच्या दुकानात काम करणाऱ्या मस्तान कुरैशी ऊर्फ नन्ना याने मटण कापणाच्या शस्त्राने तीन जणांवर हल्ला केला. यात नितीन सोनाजी संकपाळ (३५, रा. राजनगर, मुकुंदवाडी) यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. शुक्रवारी सकाळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आग्रहावरून या भागात अतिक्रमण हटाव मोहीम महापालिकेच्या सहकार्याने सुरू केली. व्यापाऱ्यांना सामानही काढण्याची संधी मिळाली नाही. एकानंतर एक टीन शेडची दुकाने जमीनदोस्त करायला सुरुवात झाली. दुकानांमधील रोख रक्कमही अनेकांना काढता आली नाही. दुकानांच्या बाहेर मालक, कर्मचाऱ्यांना काढण्याचे काम करण्यात येत होते. अवघ्या दीड तासात एसटी वर्कशॉपर्यंतची दुकाने पाडली. त्यानंतर मनपाच्या ताफ्याने मोर्चा मुकुंदवाडी भाजीमंडईपर्यंत नेला. तेथून थेट सोहम माेटर्स कॉर्नरपर्यंतची अतिक्रमणे काढली. यामध्ये दोन मजली, तीन मजली इमारतींचाही समावेश होता. दुपारी ४ वाजेनंतर मनपाने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून पुढे संजयनगर येथे पाडापाडीला सुरुवात केली. राजेश पवार या तरुणाने पत्नीसह अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यामुळे या भागात एकच धावपळ झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. पवार कुटुंबीय आक्रोश करीत होते.

पोलिस आयुक्त, मनपा प्रशासकपोलिस आयुक्त प्रवीण पवार, मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनीही कारवाईची पाहणी केली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. जी. श्रीकांत यांच्या पायाचे प्लास्टर नुकतेच काढले आहे. वॉकरच्या साहाय्याने ते चालत आहेत. मुकुंदवाडीत येऊन त्यांनी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना काेणाच्या दबावाला बळी न पडता कारवाई करा अशी सूचना केली.

५०० पोलिस, १५० मनपा कर्मचारीवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह ५०० पोलिस मुकुंदवाडी भागात सकाळी तैनात करण्यात आले होते. कारवाई करण्यासाठी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १५० कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्याचा आयुक्ताना फोनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री पोलिस आयुक्त प्रठीण पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला व सर्व माहिती जाणून घेतली. खून प्रकरणात हायकोर्टात अपील करण्याची सुचना मुख्यमंत्र्यांनी केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEnchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका