शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

मिसारवाडीत झोपड्यांची बनली टुमदार घरे; पण टँकरच्या फेऱ्या पुजलेल्याच

By साहेबराव हिवराळे | Updated: August 25, 2023 19:04 IST

जलवाहिनीतून पाणी हवे आणि डी.पी.ला कुंपण या रहिवाशांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांच्या मिसारवाडीत बाराही महिने चिखल तुडवावा लागत होता. गेल्या पंचवीस वर्षांत हळूहळू वीज, ड्रेनेज, रस्ते झाले अन् मिसारवाडी चिखलमुक्त झाली. त्याचबरोबर झोपड्यांच्या जागी पक्की घरे उभारली गेली. औद्योगिक क्षेत्रातून सिमेंट रस्ता झाल्याने रहदारीची सोय झाली. पण वसाहत अजूनही टँकरमुक्त नाही. जलवाहिनीतून पाणी हवे आणि डी.पी.ला कुंपण या रहिवाशांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत.

नागरिकांचीही साथ मिळतेसमस्यांचे निराकरण करण्यासाठी नागरिकांचीही तेवढीच साथ मिळत असल्याने निधी आणणे शक्य होते. मनपा टाकत असलेल्या जलवाहिनीमुळे टँकरमुक्ती अवश्य होईल. येथे महादेव सूर्यवंशी, भगवान रगडे, शकुंतला इंगळे, आनंद घोडेले यांनी काम केलेले आहे. सध्या विकासकामांवर भर दिला जात आहे.- शबनम बेगम कलीम कुरेशी, माजी नगरसेविका

उघड्या डी.पी.ना कुंपण लावा...विजेच्या तारा जुन्या असल्याने सातत्याने भार येऊन त्या तुटतात. जी-२० मध्ये शहर सुंदर केले होते; परंतु मिसारवाडीतील डी.पी. आजही उघड्या असून रस्त्यालगत असल्याने दुर्घटनेची भीती आहे. महावितरणने याकडे दुर्लक्ष केले आहे.- मुनीर पटेल

बचत गटांच्या महिलांना वाव द्यावा..मनपाकडून चालविल्या जाणाऱ्या कामासाठी बचत गटातील महिलांना समाविष्ट करावे, त्यांच्या उपक्रमातून कुटुंबाला हातभार लागून प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी मदत होणार आहे. मनपा अधिकाऱ्यांनी रोजगाराकडे लक्ष द्यावे.- गीताबाई म्हस्के

घरकुल योजनेची गती वाढवावी...लोकप्रतिनिधींनी असाच हातभार लावल्यास दुर्लक्षित वसाहत विकसित होईल. झोपड्यांचा विकास होण्यासाठी असलेल्या घरकुल योजनेचे धनादेश निघण्यास विलंब होतो. त्यामुळे गरीब कुटुंबांचा जीव मेटाकुटीस येतो.- अजीज खान

अंतर्गत रस्ते बनवा...प्रमुख रस्ते तयार केल्याने मुख्य समस्या सुटली; परंतु अंतर्गत रस्ते तयार नसल्याने टँकर घरापर्यंत येत नाहीत. अनेकदा पाण्यासाठी धावपळ होते. हे टाळण्यासाठी उर्वरित रस्त्यांची कामे मार्गी लावावीत.- अमोल म्हस्के

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी