शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी

By विकास राऊत | Updated: June 26, 2024 18:00 IST

नागरिकांची पाण्यासाठी वणवण : जून महिन्यात पाऊस होऊनही प्रकल्पांना पाणी नाही

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाने जून महिन्यातील सरासरी गाठल्याचे आकडे सांगत असताना एकूण लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक अजूनही टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहेत.

मराठवाड्यात पावसाळ्यात १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. विभागात पाणीटंचाईचे संकट कमी होत लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांत सुमारे १५ टक्के जलसाठा आहे. मेच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १८ मेपर्यंत १८३७ पर्यंत टँकरचा आकडा होता. आता १९ जूनपर्यंत १९३८ टँकरचा आकडा आहे. २४ जून पर्यंत १६९६ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.

जूनअखेरीस १६९६ टँकरचा आकडाजानेवारीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९, जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ३१९ वर गेली. मार्च ४३५, एप्रिल १४२४ व मे महिन्यात १८३७ वर टँकरचा आकडा गेला. जून महिन्यात १९३८ टँकर सुरू झाले. जूनअखेरपर्यंत त्यात घट झाली; परंतु ग्रामीण भागात पाणीटंचाई आहेच. ३९४२ विहिरींचे अधिग्रहण कायम आहे.

११६५ गावे, ४९३ वाड्यांवर टंचाईसध्या ११६५ गावे आणि ४९३ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. नियमित पावसाळा सुरू असूनही ग्रामस्थांचे पाण्याविना हाल आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४३४ गावे व ७३ वाड्या, जालना ३१५ गावे व ९२१ वाड्या, परभणीत २५ गावे व ७ वाड्या, हिंगोली ३ गावे व ५ वाड्या, नांदेड ११ गावे आणि २९ वाड्या, बीड २८३ गावे व २७१ वाड्या, लातूर १९ गावे आणि १६ वाड्या, तर धाराशिव जिल्ह्यात ७४ गावांत टंचाई आहे.

जिल्हानिहाय टँकर संख्याछत्रपती संभाजीनगर.......... ६९०जालना.......... ४८८परभणी.............३३हिंगोली ..........५नांदेड.............. ३९बीड ..............३०५लातूर...........२८धाराशिव........... १०८एकूण ...........१६९६

जूनची सरासरी पूर्ण, प्रकल्प कोरडेचमराठवाड्यात पाऊस बरसत असला तरी मोठ्या, लघू आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होत नसल्यामुळे पाणीटंचाईचे सावट अद्याप कायम आहे. विभागाच्या वार्षिक ६७८ मि.मी. सरासरीच्या तुलनेत आजवर १६९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात किमान १७० मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. मंगळवारी सकाळपर्यंत १.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. मोठ्या धरणांत १२.९२ टक्के जलसाठा आहे. तर लघू आणि मध्यम प्रकल्पांत ३ टक्के जलसाठा आहे.

विभागात आजवर झालेला पाऊसजिल्हा .........................पाऊसछत्रपती संभाजीनगर........१९० मि.मी.जालना .....             १८६ मि.मी.बीड............             १७७ मि.मी.लातूर.......... २०९ मि.मी.धाराशिव.......... २१२ मि.मी.नांदेड.........             ११५ मि.मी.परभणी............ १५१ मि.मी.हिंगोली............ ११९ मि.मी.एकूण................ १६९ मि.मी.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादWaterपाणीRainपाऊस