शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाला चाऱ्यापेक्षा पाणीटंचाईच्या अधिक झळा

By विजय सरवदे | Published: March 11, 2024 11:47 AM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २३.४२ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध

छत्रपती संभाजीनगर : यंदा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. दुसरीकडे, पशुधनासाठी पाच- सहा महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असला तरी पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा त्यांना बसणार आहेत.

जि. प. पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या टंचाई कृती आराखड्यानुसार जूनपर्यंत जिल्ह्यातील ९०२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासणार असून यापैकी ६२६ गावांत पिण्याच्या पाण्यासाठी ८३५ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. यामध्ये जनावरांचे मोठे हाल होणार आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट- सप्टेंबरमध्येच उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यानुसार येणाऱ्या पाच- सहा महिने तरी जनावरांना चाराटंचाईची फारशी झळ बसणार नाही. एकंदरीत सर्व उपाययोजनांनुसार २३ लाख ४२ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झालेला आहे. यामध्ये खरीप हंगामात १२ लाख ६८ हजार मेट्रिक टन, तर रब्बी हंगामात ४ लाख ४ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला आहे. तसेच नैसर्गिक स्रोतांपासून २ लाख १७ हजार मेट्रिक टन चारा निर्माण झाला आहे. याशिवाय पशुसंवर्धन विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे १ लाख ४१ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला आहे. यासाठी ८ हजार ६१० शेतकऱ्यांना वैरणीचे ६०२.७० क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले होते. एवढेच नाही, तर ३ लाख १२ हजार मेट्रिक टन मुरघास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चाराटंचाईपेक्षा यंदा जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे.

जिल्ह्यात जनावरांची स्थितीमोठी जनावरे- ४ लाख ७४ हजार ७५२लहान जनावरे- १ लाख ५८ हजार २५१शेळी- मेंढी- ५ लाख १९ हजार ४२६

जनावरांना लागणारा चाराजिल्ह्यातील एकूण ६ लाख ३३ हजार जनावरांना दरदिवशी वाळलेला चारा ३ हजार ८४३ मेट्रिक टन एवढा लागतो, तर महिन्याकाठी हा चारा १ लाख १५ हजार २८१ मेट्रिक टन लागतो.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाईAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद