शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्टेशनच्या पुनर्विकासात झाडांवर कुऱ्हाड पडून शेकडो पक्षी बेघर होण्याची भीती

By संतोष हिरेमठ | Updated: August 10, 2023 15:25 IST

जैवविविधतेला पोषक जागा जपून स्टेशनचे काम करण्याची पर्यावरणप्रेमींची अपेक्षा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनचा ३५९ कोटी रुपयांच्या निधीतून पुनर्विकास करून रुपडे बदलण्यात येणार आहे. शहराच्या दळणवळण क्षेत्रासाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे. मात्र, स्टेशनचा पुनर्विकास करताना झाडांवर कुऱ्हाड पडून शेकडो पक्षी बेघर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातून परिसरातील जैवविविधेतेला पोषक असलेल्या जागांवर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या जागा जपून स्टेशनचे काम करण्याची अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनचा डिसेंबर २०२५ पर्यंत पुनर्विकास करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हे विविध टप्प्यांत केले जाणार आहे. रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीच्या परिसरातून या कामाला सुरुवात केली जाणार आहे आणि जुन्या रेल्वेस्टेशनच्या परिसरातच सर्वाधिक झाडे आहेत. या झाडांवर बगळ्यांपासून विविध पक्ष्यांची घरटी आहेत.

किती झाडांवर संकट?रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीच्या परिसरात १५ पेक्षा अधिक झाडे आहेत. यातील काही झाडे अगदी इमारतीला आणि प्लॅटफार्मला लागून आहेत. महापालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील म्हणाले, स्टेशन परिसरातील काही झाडांच्या फांद्या छाटणीची परवानगी मागण्यात आलेली आहे. स्टेशन परिसरातील झाडांसंदर्भात अधिक माहिती घेतली जाईल.

सध्या इमारती किती आणि नवी इमारत किती क्षेत्रात?- सध्याच्या ५ हजार ६७५ चौ.मी.च्या तुलनेत प्रस्तावित स्थानक इमारतीचे क्षेत्र २७ हजार ७३ चौ.मी राहणार आहे. उत्तर स्थानक इमारत २२ हजार १८० स्वेअर मीटर आणि दक्षिण स्थानक इमारत ४ हजार ८९३ स्वेअर मीटरमध्ये राहणार आहे. टर्मिनल बिल्डिंग आणि सर्व प्लॅटफॉर्मला जोडणारा ७२ मीटर डबल लेव्हल एअर कॉन्कोर्स असेल. तर रूफ प्लाझा (७२ बाय ६६ मीटर) आणि छताचे आवरण क्षेत्र २८ हजार ८०० चौ.मी. राहणार आहे.

‘डीआरएम’ म्हणाल्या...दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार म्हणाल्या, रेल्वेस्टेशनचे काम करताना झाडे कापण्याची वेळ येणार नाही. अशावेळी झाडे इतर जागेत पुनर्रोपित केली जातात. छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवरील झाडांसंदर्भात नेमके काय केले जात आहे, याची माहिती घेतली जाईल.- औरंगाबाद उद्यान अधीक्षक

झाडे आणि पक्षी दोन्ही वाचावीरेल्वेस्टेशन मोठे बनविले जात आहे, हे महत्त्वाचे आहे. मात्र, स्टेशनचे काम करताना झाडे वाचविण्याचा प्रयत्न करावा. त्यावर पक्ष्यांची घरटी आहेत. स्टेशन परिसर जैवविविधतेचे पोषक वातावरण आहे. झाडे वाचवूनच स्टेशनचे काम केले पाहिजे.- रवी चौधरी, अध्यक्ष, प्रयास यूथ फाउंडेशन

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण