शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी पर्यटकांनी औरंगाबादेत यायचे की नाही? चीनच्या अधिकाऱ्यांची बस रोखली, दंड लावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 12:48 IST

भरधाव वाहने व वाहतूक कोंडीमुळे तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासगी बसला रात्री ११ वाजेनंतरच शहरातील जालना रोडवर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : जालना रोडवर खासगी प्रवासी बसला सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु टूरिस्ट बसला ‘नो एंट्री’च्या नावाखाली रोखण्याचा प्रकार होत आहे. दोन दिवसांपूर्वी चीनच्या दूतावासातील अधिकारी असलेली बस रोखण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी परदेशी पाहुणे असलेल्या बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे परदेशी पाहुणे, पर्यटकांनी शहरात यायचे की नाही, असा सवाल टूरिस्ट बसचालक उपस्थित करीत आहेत.

भरधाव वाहने व वाहतूक कोंडीमुळे तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासगी बसला रात्री ११ वाजेनंतरच शहरातील जालना रोडवर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. जी-२० अंतर्गत वूमन-२० परिषदेसाठी औरंगाबादेत फेब्रुवारीत विविध देशांतील प्रतिनिधी येणार आहेत. काही दिवसांपासून यासाठी तयारी सुरू आहे. पण या सगळ्यात दिवसा जालना रोडवरून देश-विदेशातील पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या टूरिस्ट बस वाहतूक पोलिसांकडून रोखण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी चीनचे अधिकारी असलेली बस तासभर थांबविण्यात आली. मंगळवारी परदेशी नागरिक असलेल्या बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पर्यटकांची संख्या वाढणार कशी?या बसमध्ये चीनच्या दूतावासातील लोक होते. परंतु बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमित ट्रॅव्हल्स आणि टूरिस्ट बसमध्ये फरक आहे. दिवसा जर टूरिस्ट बस येऊ द्यायची नाही म्हटली, तर पर्यटकांची संख्या वाढणार कशी, असा सवाल आहे. टूरिस्ट बसला शहरात कधीही प्रवेश मिळावा.- जसवंत सिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाैंडेशन.

ज्यांना परवानगी, त्यांच्यावर कारवाई नाहीदिवसा शहरात प्रवेश करण्यासाठी ट्रॅव्हल्स बससंदर्भात काही नियमावली आहे. त्या नियमानुसार वाहतूक पोलिस कारवाई करतात. दिवसा ज्या ट्रॅव्हल्स बसला शहरात प्रवेशाची परवागनी आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही. ज्यांना परवानगी नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. हा नियम सर्व ट्रॅव्हल्स बसला लागू आहे.- दिलीप गांगुर्डे, प्रभारी, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनPoliceपोलिस