शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

जलील, खैरे प्रचारात; उमेदवारीच्या घोळात महायुतीने प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन उरकले

By सुमेध उघडे | Published: April 17, 2024 3:29 PM

जलील, खैरे यांच्या प्रचाराची सुरुवात झाली तरी महायुतीच्या उमेदवार निश्चित झालेला नाही.

छत्रपती संभाजीनगर: महायुतीमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला? उमेदवारी कोणाला ? हा घोळ अद्याप मिटला नाही. यामुळे विरोधी पक्षाने जोरदार टीकेची झोड उठवली असताना रामनवमीचा मुहूर्त साधून आज सकाळी महायुतीच्या नेत्यांनी शहरातील प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन केले. यावेळी पालकमंत्री संदीपान भूमरे, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावे आणि अब्दुल सत्तार यांच्यासह महायुतीचे जिल्हाभरातील आमदार, नेत्यांनी उपस्थिती लावली होती. 

राज्याचे लक्ष असलेल्या औरंगाबाद मतदारसंघात सर्वात प्रथम एमआयएमने खासदार इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर महाविकास आघाडीत मतदारसंघ ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे गेला, पण उमेदवारी जाहीर होण्यात त्यांनीही वेळ घेतला. विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच झाली. दरम्यान, खैरे यांनी देखील उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन केले. यातच मानापमान नाट्य घडत दानवे- खैरे वाद पेटला. पण अखेर खैरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. दुसरीकडे मतदारसंघ आमचाच असा दावा शिंदेसेना आणि भाजपा दोघांनी केल्याने महायुतीत वातावरण तापले. आता जागा शिंदेसेनेला सुटली असल्याची माहिती आहे. मात्र, उमेदवार कोण ? याचे उत्तर महायुतीत कोणीच देऊ शकत नाही. 

जलील, खैरे प्रचारात; महायुती उमेदवाराच्या शोधातखासदार जलील यांच्या प्रचारार्थ एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी तीन दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहेत. तर खैरे यांनी देखील ग्रामीण भागात संपर्क वाढवून प्रचारात आघाडी घेतली आहे. यासोबतच वंचितचे उमेदवार अफसर खान यांनी देखील ईद आणि आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहच वाढवली आहे. उमेदवारी ठरत नसल्याने महायुतीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यातच किमान प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजानाने तरी महायुतीचे सर्व नेते एकत्र आले. उमेदवाराच्या घोळात स्तंभपूजन उरकून आता आम्ही देखील कंबर कसली आहे, फक्त उमेदवार जाहीर होण्याचे बाकी असल्याचा स्वर महायुतीच्या नेत्यांच्या भाषणातून दिसून आला.

महायुतीकडून औरंगाबादच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायमऔरंगाबादची जागा शिंदेसेनेला देण्याचे निश्चित झाल्यानंतर भाजपचे स्थानिक इच्छुक बॅकफुटवर गेले आहेत. तर दुसरीकडे शिंदेसेनाच येथील जागा लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यापासून इच्छुक उमेदवार जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४aurangabad-pcऔरंगाबादmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेImtiaz Jalilइम्तियाज जलील