तडीपारीच्या प्रस्तावावर अंमलबजावणी होईना !
By Admin | Updated: September 1, 2016 01:15 IST2016-09-01T00:49:31+5:302016-09-01T01:15:12+5:30
राजकुमार जोंधळे , लातूर जिल्हा पोलिस दलातील २३ पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने ७४ तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहेत

तडीपारीच्या प्रस्तावावर अंमलबजावणी होईना !
राजकुमार जोंधळे , लातूर
जिल्हा पोलिस दलातील २३ पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने ७४ तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहेत. यंदा ७४ पैकी ९ जणांवर आतापर्यंत तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस दलातील चाकूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा आणि लातूर ग्रामीण आणि लातूर शहर उपविभागाअंतर्गत येणाऱ्या २३ पोलिस ठाण्यांच्या स्टेशन डायरीवर सराईत आणि अट्टल गुन्हेगारांचे रेकॉर्ड संकलित करुन त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने महसूल प्रशासनाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहेत. आतापर्यंत ७४ प्रस्ताव या उपविभागातून दाखल करण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ ९ प्रस्तावावर सुनावणी झाली असून, त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
उर्वरित ६५ प्रस्तावांची सुनावणी सुरु असून, गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला तरी, अंमलबजावणी झाली नाही, हे विशेष़
विविध पोलिस ठाण्यांच्या क्राईम डायरीवर असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्याबाबत प्रस्ताव दाखल केले जातात. मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर या प्रस्तावांची सुनावणी होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी तडीपारीच्या कारवाईचा निर्णय घेतात. याबाबत पोलिस प्रशासानाच्या हाती केवळ अशा गुन्हेगारांचे रेकार्ड संकलित करुन ते उपविभागीय अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी पाठविणे एवढेच असते. असे अपर पोलिस अधीक्षक लता फड यांनी सांगितले.
रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांच्या तडीपारीसाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने २०१६ मध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी ५५ प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत. तर २०१६ मध्ये ७४ पैकी ९ प्रस्ताव निकाली काढण्यात आल्यामुळे ६५ तडीपारीचे प्रस्ताव पडून आहेत. गेल्या दोन वर्षापासून तब्बल १२० प्रस्तावर तडीपारीची अंमलबजावणी न झाल्यामुळे अद्यापही लटकले आहेत.