शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित, नवीन अर्थसंकल्पाचे कामच सुरू झाले नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:46 IST

राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये सध्या अर्थसंकल्प मंजूर करण्यात येत आहे. फेब्रुवारीअखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाकडून मागील वर्षीचे सुधारित आणि नवीन आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प सादर करण्यात येतात. यंदा महापालिकेने सुधारित तर सोडा नवीन अर्थसंकल्पाचेही काम सुरू केलेले नाही. मागील वर्षीच क्षमतेपेक्षा तीनपट मोठा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. या अर्थसंकल्पाची शंभर टक्के अंमलबजावणी करायचे म्हटले तर पुढील दोन वर्षे तरी नवीन अर्थसंकल्प तयार करण्याची गरज प्रशासनाला पडणार नाही.

ठळक मुद्देमहापालिका : १८०० कोटींच्या अर्थसंकल्पाचे परिणाम

औरंगाबाद : राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये सध्या अर्थसंकल्प मंजूर करण्यात येत आहे. फेब्रुवारीअखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाकडून मागील वर्षीचे सुधारित आणि नवीन आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प सादर करण्यात येतात. यंदा महापालिकेने सुधारित तर सोडा नवीन अर्थसंकल्पाचेही काम सुरू केलेले नाही. मागील वर्षीच क्षमतेपेक्षा तीनपट मोठा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. या अर्थसंकल्पाची शंभर टक्के अंमलबजावणी करायचे म्हटले तर पुढील दोन वर्षे तरी नवीन अर्थसंकल्प तयार करण्याची गरज प्रशासनाला पडणार नाही.महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी मिळून २०१८-१९ या आर्थिक वर्षात १८६४ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला होता. महापालिकेच्या इतिहासात एवढा फुगीर अर्थसंकल्प कधीच तयार करण्यात आला नव्हता. १२ महिने उलटल्यानंतरही अर्थसंकल्पातील ठोस विकासकामांचे भूमिपूजनही सत्ताधाऱ्यांना करता आले नाही. हजारो विकासकामे करण्यात येणार असल्याचे दिवास्वप्न नगरसेवकांनी नागरिकांना दाखविले. अर्थसंकल्पात समाविष्ट कामांची यादीच नगरसेवकांनी सोशल मीडियावर टाकून पाठ थोपटून घेतली होती. या यादीतील किती कामे झाली, हे तपासले तर नगरसेवकांचे बिंग फुटेल. महापालिकेची आर्थिक क्षमता नसताना कशासाठी तीनपट मोठा अर्थसंकल्प तयार केला...? प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी फुगीर अर्थसंकल्प तयार करून काय मिळविले...? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.महापालिका अधिनियमानुसार प्रशासनाला फेब्रुवारीअखेर किंवा मार्च महिन्यात सुधारित आणि नवीन अर्थसंकल्प सादर करणे बंधनकारक आहे. मागील काही दिवसांपासून महापालिका मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. यालाही १८०० कोटींचा अर्थसंकल्पच कारणीभूत आहे. गरज नसेल तेथे कोट्यवधी रुपयांची कामे अर्थसंकल्पात टाकण्यात आली. त्यातील काही कामांची बिलेही लेखा विभागात दाखल झाली आहेत. आजच लेखा विभागावर २१३ कोटींच्या बिलांचे दायित्व येऊन ठेपले आहे.आयुक्तांसाठी १०८ कोटींची तरतूदमहापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अर्थसंकल्पात विविध विकासकामांसाठी १०८ कोटींची तरतूद करायला लावली. हेरिटेजसाठी ३० कोटी, क्रीडा विकास २० कोटी, शिक्षण आणि आरोग्यासाठी २५ कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी १३ कोटी, लोकसहभागातील कामांसाठी १० कोटी आणि प्राणी कल्याण १० कोटी, अशी १०८ कोटींची तरतूद केली होती. यातील एकही काम आयुक्तांना करता आलेले नाही.सत्ताधाºयांची निव्वळ जुमलेबाजी...मोफत अंत्यसंस्कार योजना, स्व. सौ. मीनाताई ठाकरे कन्या सुरक्षा मुदतठेव योजना, पदमपुरा येथे राखीव जागेवर नियोजित प्रशासकीय इमारत, मनपाचे विश्रामगृह, आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांसाठी वसतिगृह, गरवारे स्वीमिंग पुलाचे काम करणे व क्रीडा संकुल विकास २० कोटी, ज्योतीनगर येथील जलतरण तलाव पुन्हा कार्यान्वित करणे. मनोरंजन पार्क, नाना-नानी, आजी-आजोबांसाठी पार्क, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, रोझ गार्डन, दिव्यांगासाठी उद्यान, सलीम अली सरोवर विकसित करणे, वृक्ष लागवड-संवर्धन, जांभूळवन, हर्सूल येथे आॅक्सिजन पार्क उभारणे आदी शेकडो घोषणा सत्ताधाºयांकडून करण्यात आल्या. अंमलबजावणी करण्यात सत्ताधारी-प्रशासन अपयशी ठरले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBudget 2019अर्थसंकल्प 2019