पेपरफुटी एजंटच्या घरातून महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त
By Admin | Updated: February 3, 2015 01:00 IST2015-02-03T00:54:29+5:302015-02-03T01:00:37+5:30
औरंगाबाद : यवतमाळ पेपरफुटी प्रकरणातील मुख्य एजंट असलेल्या सुनील ठोंबरेच्या घरातून या घोटाळ्याबाबत महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहे.

पेपरफुटी एजंटच्या घरातून महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त
औरंगाबाद : यवतमाळ पेपरफुटी प्रकरणातील मुख्य एजंट असलेल्या सुनील ठोंबरेच्या घरातून या घोटाळ्याबाबत महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहे. विशेष म्हणजे केवळ यवतमाळ जि. प. भरती घोटाळ्यातच नव्हे तर अमरावती जि. प. नोकरभरती घोटाळ्यातही या टोळीचा हात असल्याचेही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुनील ठोंबरेला दोन दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली होती. यवतमाळ जि. प. नोकर भरतीचा पेपर फोडणाऱ्या टोळीतील सुनील हा मुख्य एजंट होता. बेरोजगार शोधून आणणे आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन या टोळीच्या मदतीने त्यांना नोकरीवर लावणे, असा सुनीलचा उद्योग होता. त्याच्या जयभवानीनगरातील घरावर पोलिसांनी काल छापा मारला. सुनीलने अमरावती जि.प.साठी झालेल्या नोकरभरतीत दोन उमेदवारांना पैसे घेऊन नोकरी लावून दिल्याचेही तपासात समोर आले आहे.