शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वेळेचे महत्व...! परीक्षा केंद्राचे गेट लगेच बंद; अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 19:23 IST

विद्यार्थ्यांकडून नाराजी, युवा सेनेचे पदाधिकारी आक्रमक, आय ऑन डिजिटल केंद्रावरील घटना

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीत ‘आय ऑन डिजिटल’ या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी प्रवेशद्वार बंद झाल्यावर तीन मिनिटांनी पोहोचले. मात्र, प्रवेशद्वार बंद झाल्यावर प्रवेश न मिळाल्याने ११ विद्यार्थी सीआरपीएफच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेला मुकले. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे दाद मागितली. मात्र, परीक्षा केंद्राने आडमुठी भूमिका घेतल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही.

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीआरपीएफमधील विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा सध्या सुरू आहेत. विविध पदांसाठी असलेल्या परीक्षेला मराठवाड्यातून विद्यार्थी आलेले होते. सकाळी ११:४५ ते १२:४५ वाजण्याच्या दरम्यान असलेल्या परीक्षेसाठी ११:१५ वाजेपर्यंत प्रवेशासाठी मुदत होती. प्रवेशाची वेळ संपल्यावर काही मिनिटांनी धापा टाकत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी आत घेण्याची विनंती केली. मात्र, त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना केंद्रावर बोलावले. हनुमान शिंदे, ज्ञानेश्वर डांगे, मनोज बोरा, मनोज गांगवे, स्वप्निल डिडोरे यांनी केंद्र संचालकांकडे विद्यार्थ्यांना संधी देण्याची मागणी केली. मात्र, केंद्र संचालकांनी परीक्षा सुरू होईपर्यंत दाद दिली नाही. अखेर परीक्षा सुरू झाल्यावर केंद्रावरील अधिकारी पदाधिकाऱ्यांशी बोलले; पण त्यावेळी वेळ निघून गेली होती, असे नाशिक जिल्ह्यातून ढेकू खुर्द येथून परीक्षेसाठी आलेल्या रितिका जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

केंद्र शोधण्यातही अनेकांना उशीर...केंद्र शोधण्यात वेळ गेल्याने पाच मिनिटे उशीर झाला. त्यामुळे फुलंब्री येथील आलेल्या राहुल पवार यांनाही परीक्षेला मुकावे लागले. सागर गोराडे, योगेश राठोड, अनिकेत पाटील, गौरव ठोंबरे, महेश जुधरे, नीलेश गोडखे, गणेश पानखेड, रामेश्वर देवगाेने, राहुल गोलवडे, यांचीही परीक्षेची संधी हुकली. या विद्यार्थ्यांना हेल्पलाइनवर मेल पाठवून दाद मागण्याचे सांगून माघारी पाठविण्यात आले.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाAurangabadऔरंगाबाद