ग्राहक संरक्षण व हक्क संवर्धनास महत्त्व देणार
By Admin | Updated: December 25, 2016 00:06 IST2016-12-25T00:04:30+5:302016-12-25T00:06:44+5:30
जालना : पुरवठा विषयक काम करत असताना ग्राहकांचे हक्क आणि त्यांचे संवर्धनावर पुरवठा विभाग लक्ष देऊन त्याचे निराकरण करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदरकर यांनी व्यक्त केले.

ग्राहक संरक्षण व हक्क संवर्धनास महत्त्व देणार
जालना : जिल्ह्यात पुरवठा विषयक काम करत असताना ग्राहकांचे हक्क आणि त्यांचे संवर्धनावर पुरवठा विभाग लक्ष देऊन त्याचे निराकरण करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदरकर यांनी व्यक्त केले. शनिवारी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उदघाटक व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष सतीश पंच तसेच ग्राहक चळवळीतील विजयकुमार पंडित, नायब तहसीलदार नंदकिशोर दांडगे, विश्वनाथ ढवळे, प्रा. डॉ. रेणुका भावसार, सांडू शिंदे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. ग्राहक जागृती संबंधी डॉ. भावसार म्हणाल्या, ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याची पर्यायी व्यवस्थेबाबत आणि मूल्य शिक्षणातून चांगली व्यक्ती तयार झाली पाहिजे. चांगली व्यक्ती हीच चांगला ग्राहक होऊ शकते. नंदकर यांनी पुरवठा विषयक कामकाज करत असताना ग्राहक संरक्षण व हक्क संवर्धनास महत्त्व देणार असल्याचे
सांगितले.
ग्राहकांच्या फसवणुकीचे व अन्नभेसळीचे अनुभव कथन केले आणि सुदृढ भावी पिढी निर्माण करण्याकरिता प्रत्येकाने जीवनाश्यक वस्तू खरेदी करताना जागृत राहिले पाहिजे. ग्राहकांच्या तक्रार निवारणा करीता शासकीय व्यवस्थेची माहिती देऊन ग्राहक जागृतीचा कार्यक्रम पुरवठा विभागामार्फत वर्षभर राबविण्याची गरज आहे, असे सांगितले.
भविष्यात प्रत्येक महिन्याला ग्राहक हक्क संरक्षण व जाग्रती कार्यशाळा घेण्याचे सूतोवाच केले. ग्राहकांच्या मार्गदर्शनासाठी पुरवठा विभाग कायम अग्रेसर राहील असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)