दुष्काळ निवारणार्थ योजनांची अंमलबजावणी करा- रक्षाताई खडसे

By Admin | Updated: April 20, 2016 23:20 IST2016-04-20T23:07:00+5:302016-04-20T23:20:55+5:30

जाफराबाद : महाराष्ट्रात वारंवार दुष्काळ पडत आहे. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दुष्काळावर रामबाण इलाज म्हणून भाजपा सरकार

Implement schemes for drought relief - Protecting Khadse | दुष्काळ निवारणार्थ योजनांची अंमलबजावणी करा- रक्षाताई खडसे

दुष्काळ निवारणार्थ योजनांची अंमलबजावणी करा- रक्षाताई खडसे


जाफराबाद : महाराष्ट्रात वारंवार दुष्काळ पडत आहे. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दुष्काळावर रामबाण इलाज म्हणून भाजपा सरकार राबवित असलेल्या योजनांची प्रशासनाने जनतेचे सहकार्य घेऊन प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन खा. रक्षाताई खडसे यांनी बुधवारी येथे केले.
जाफराबाद तालुक्यातील आसई, वरूड खु. पिंपळगाव कड, बेलोरा, खासगाव या गावांचा त्यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
रक्षाताई खडसे या जाफराबाद तालुक्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्यांनी जलयुक्त शिवार, दुष्काळी व उपाययोजना या संदर्भात पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात आ. संतोष पा. दानवे यांनी वरूड बु. येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जलसिंचनाचे कामे प्रभावीपणे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्याच्या निमित्ताने आसई येथे ४ मोठे सिमेंट बंधारे १.९५ कोटी, पिंपळगाव कड येथे ९ मोठे बंधारे २.१० कोटी, वरूड खु. ३ मोठे बंधारे १.७ कोटी तसेच बेलोरा येथे ६ सिमेंट नालाबांधसाठी १ कोटी २० लाख एवढा निधी उपलब्ध करून दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष गोविंदराव पंडित, कृषी सभापती संतोष लोखंडे, जि.प.सदस्य शालिकराव म्हस्के, विजयनाना परिहार, सभापती चंद्रकांत चौतमल, कृउबा सभापती भाऊसाहेब जाधव, तहसीलदार गाढे, चौलवार, भगवानराव लहाने, शिवसिंग गौतम, मधुकर गाढे, नाना भागिले, कृषी अधिकारी सांगावे, वाघचौरे, जाधव, अंभोरे, अरूण अवकाळे, साहेबराव कानडजे, सुधीर पाटील, गजानन घाटगे, साहेबराव मोरे, विजय परिहार, अनिल बोर्डे, संजय खंडेलवाल, दगडुबा मोरे, कैलास इंगळे,
रतन चव्हाण, अनिल चौतमल, उद्धव दुनगहू आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)

Web Title: Implement schemes for drought relief - Protecting Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.