शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांचा तोतया ओएसडी, बोगस आयएएस कल्पनाच्या अफगाणी प्रियकराला दिल्लीत बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:59 IST

तपास यंत्रणांचे मोठे यश : शुक्रवारी रात्री दिल्लीतून दोघांना घेतले ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : सहा महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणाऱ्या तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवतच्या मोबाईलमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांचा ओएसडी म्हणून मिरवणाऱ्या अभिषेक चौधरीच्या शुक्रवारी रात्री तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी मुसक्या आवळल्या. कल्पनाचा अफगाणी प्रियकर महंमद अशरफ खिल रात्रीच पकडला गेला. दोघेही दिल्लीतच सापडले.

अभिषेकच्या संपर्कात कल्पना होती. त्यामुळे अशा अनेक तोतया आयएएस अधिकाऱ्यांचे सिंडिकेटच असल्याचे सबळ पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले. सोमवारपासून तपास यंत्रणांचे चार पथक दिल्ली, नोएडा, हरयाणा, राजस्थान सीमेवर त्याचा कसून शोध घेत होती. शुक्रवारी रात्री या तोतया ओएसडीला पकडण्यात तपास यंत्रणांना यश आले. संबंधित तोतया अधिकारी व कल्पनाचा प्रियकर एकमेकांच्या संपर्कात आहेत का, हा तोतयादेखील विदेशी लोकांच्या संपर्कात आहे का, यासाठी एक स्वतंत्र पथक तपास करत आहे.

तिचे प्राथमिक शिक्षण झालेल्या वैजापूर येथील शाळेकडून देखील आता गुप्तचर यंत्रणांनी माहिती मागवली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडूनही तिच्या नियुक्ती व बडतर्फीबाबत कागदपत्र मागवले जाणार आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह एटीएस, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून कल्पनाची कसून चौकशी सुरू आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तानसोबत बांग्लादेश, सौदी अरेबियिाच्या संपर्क क्रमांकावर कल्पनाने किती वेळा संपर्क केला, त्या क्रमांकावरून तिला कॉल आले का, याची माहिती मिळवण्यासाठी आता शहर पोलिसांनी नेटवर्क कंपन्यांना ई-मेलद्वारे माहिती मागितली आहे. चौकशीदरम्यान कल्पना अद्यापही उडवाउडवीची उत्तरे देत आहे. दरम्यान, कल्पनाला १९ लाख व ६ लाखांचे धनादेश देणाऱ्या चेतन भानुशाली व निखिल भाकरे यांच्याबाबत बोलणे पोलिसांनी टाळले.

गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, यात दत्तात्रयने ७ लाख २० हजार, अभिजितने १ लाख ५० हजार, अशरफ नावाच्या व्यक्तीने २ लाख ३१ हजार, जैनने १ लाख ५० हजार, सुधाकर नावाच्या व्यक्तीने १ लाख २१ हजार, आष्टेकर नावाच्या व्यक्तीने १ लाख ५० हजार, बहादुरे नावाच्या व्यक्तीने ९८ हजार रुपये दिल्याची खात्रीलायक माहिती दिली. शहर पोलिसांनी मात्र यावर बोलणे टाळले. ही माणसे कोण आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बांधकाम व्यावसायिकांच्या संपर्कात : कल्पनाचे वडील शिक्षक होते. त्यांची पेन्शन आईला मिळते. त्यातील पैसे दोघींनी हॉटेलवर खर्च केल्याचा अंदाज आहे. शहरात ती अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या संपर्कात होती. आयएएस, लॉबिस्ट असल्याचे सांगून कल्पना त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे.

लोढा, शेटेने दिली 'ती' सूचीगत रविवारी कल्पनाला जालना रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ताब्यात घेण्यात आले. त्यात कल्पनाकडे २०१७ ची युपीएससी ची निवडसूची मिळाली. कल्पनाने त्यात स्वतःचे नाव टाकून बनावट सूची तयार केली होती. ही यादी मनोज लोढा व दत्तात्रय शेटे यांनी दिल्याचे कल्पना सांगते. या व्यक्ती अस्तित्वात आहेत की, ती नावेही बनावट याचा शोध पोलिस घेत आहेत.

कोणी किती पैसे दिले?दरम्यान, तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कल्पनाला १९ लाख रुपये आल्याचे समोर आले होते. केंद्रिय गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, यात दत्तात्रयने ७ लाख २० हजार, अभिजितने १ लाख ५० हजार, अशरफ नावाच्या व्यक्तीने २ लाख ३१ हजार, जैनने १ लाख ५० हजार, सुधाकर नावाच्या व्यक्तीने १ लाख २१ हजार, आष्टेकर नावाच्या व्यक्तीने १ लाख ५० हजार, बहादुरे नावाच्या व्यक्तीने ९८ हजार रुपये दिल्याची खात्रीलायक माहिती दिली. शहर पोलिसांनी मात्र यावर बोलणे टाळले. ही माणसे कोण आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आईशी बोलल्याशिवाय जेवणार नाही...दरम्यान, क्रांतीचौक पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पनाचे नखरे कायम आहेत. रात्री ती आईसोबत कॉलवर बोलणे करून देण्याची मागणी करते. अन्यथा जेवणार नाही, असा हट्ट करते. अधिकाऱ्यांनी मात्र कोठडीतून कॉलवर बोलणे करुन देण्यास साफ नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Home Minister's OSD, Afghan lover arrested in Delhi.

Web Summary : A fake IAS officer and her Afghan boyfriend were arrested in Delhi. The woman, posing as an IAS officer, stayed in a hotel for months. Investigations revealed a possible syndicate and financial dealings with several individuals.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी