शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिस उपनिरीक्षकाचा तरुणीवर अत्याचार; १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:55 IST

पोलिस असल्याचं खोटं सांगितलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् अत्याचार केला; जळगावच्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी

छत्रपती संभाजीनगर : पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून २४ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी अमित लालखा तडवी (२४, रा. गोंदेगाव, ता. जामनेर, जि. जळगाव, ह.मु. छत्रपती संभाजीनगर) याला सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी शुक्रवारी (दि. २७) १० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली १५ हजार रुपये दंड ठोठावला. दंडापैकी १० हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशात नमूद आहे.

काय आहे प्रकरण ?फिर्यादीनुसार फेब्रुवारी २०२३ पासून आरोपी अमित तडवी त्यांच्या घरात किरायाने राहत होता. मे २०२३ मध्ये तरुणीच्या आईवर शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून अमित त्यांना मदत करीत होता. त्याची तरुणीशी मैत्री झाली. पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून त्याने ओळख वाढविली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. १९ सप्टेंबर २०२३ रोजी तरुणी घरात एकटी असताना आरोपीने बळजबरी शरीरसंबंध प्रस्थापित केला. सदर तरुणी, तिचा भाऊ, आरोपी आणि त्याचा मित्र २२ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबईला गेले होते. तेथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पुन्हा अत्याचार केला. त्याची तोतयेगिरी समोर आल्यावर १३ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याला घरातून हाकलून दिले होते. त्यानंतर त्याच्या मित्राने धमकी दिली. याबाबत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

खटल्याची सुनावणी व शिक्षातत्कालीन उपनिरीक्षक ई.एस. कामठे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी साहाय्यक लोकअभियोक्ता अरविंद बागुल यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून कलम ३७६ (२)(एन) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार दंड, कलम ४१७ आणि कलम १७० अन्वये एक वर्षाचा कारावास आणि प्रत्येकी २ हजार दंड आणि कलम ५०६ अन्वये ६ महिन्यांचा कारावास आणि एक हजाराचा दंड ठोठावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Cop Rapes Woman; Sentenced to 10 Years Rigorous Imprisonment

Web Summary : A man posing as a police officer was sentenced to 10 years rigorous imprisonment for raping a 24-year-old woman in Chhatrapati Sambhajinagar. The court also imposed a fine and ordered compensation for the victim after he was found guilty of rape and impersonation.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी