शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

तोतया महिला आयएएस अधिकारी: फसवणूक झालेल्यांना साक्षीदार करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:50 IST

कल्पनाच्या पोलिस कोठडीचे १३ दिवस पूर्ण, तेरा दिवसांत फसवणूक, बनावट कागदपत्रांच्याच दिशेने तपास

छत्रपती संभाजीनगर : तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवत हिने अनेकांना अधिकारी असल्याचे भासवून पैसे घेतले. सुरुवातीला अफगाणी प्रियकरामुळे गंभीर वळण मिळाले होते. मात्र, आता फसवणुकीच्याच अनुषंगाने तिने पैसे घेतलेल्या व्यक्तींना आता गुन्ह्यात साक्षीदार करण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

दि. २३ नोव्हेंबर रोजी जालना रस्त्यावरील हॉटेलमधून कल्पनाला ताब्यात घेण्यात आले. सहा महिन्यांपासून वास्तव्य असल्याने तपास यंत्रणांना संशय आल्यानंतर सिडको पोलिसांनी महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने तिची चौकशी केली. तिच्या खोलीच्या तपासणीत आयएएस अधिकारी असल्याचे कागदपत्रे आढळल्यानंतर तिला अटक करण्यात आली. न्यायालयाने ६ डिसेंबरपर्यंत दहा दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे आज दुपारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.

एक दिवसाच्याच पोलिस कोठडीचा अधिकारसाधारण १४ दिवसांच्या पोलिस कोठडीचा पोलिसांना अधिकार आहे. शनिवारी कल्पनाच्या १३ दिवसांच्या पोलिस कोठडीचा कालावधी पूर्ण होत आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, कल्पना बाबतची प्रत्यक्षातली चौकशी पूर्ण झाली असून, आता केवळ तांत्रिक पुरावे व नोटीस पाठविलेल्या २८ जणांच्या जबाबावरच तपास होणार आहे.

फसवणूकीच्या दिशेने तपासवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कल्पनाच्या तेरा दिवसांच्या चौकशीत आयएएस असल्याचे भासवून तिने पैसे घेतल्याचे सबळ पुरावे हाती लागले आहे. त्यामुळे शनिवारी पोलिस न्यायालयात नव्याने काय भूमिका मांडतात, पोलीस एक दिवसाच्या वाढीव पोलिस कोठडीची मागणी करणार की तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशरफ, डीम्पीची चौकशी सुरूचअटकेतील मोहम्मद अशरफ गिल व तोतया ओएसडी डीम्पी देवेंद्रकुमार हरजाई या दोघांची अजूनही चौकशी सुरू आहे. सोमवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake IAS Officer: Victims Likely to Become Witnesses

Web Summary : Kalpana Bhagwat, a fake IAS officer, allegedly took money from people by posing as an official. Victims may become witnesses as the investigation focuses on fraud. Two accomplices are also under investigation.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर