आयएमएचे १२०० डॉक्टर बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 00:21 IST2017-03-24T00:19:53+5:302017-03-24T00:21:22+5:30
लातूर : डॉक्टरावर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ व सरकारने डॉक्टरांना योग्य ती सुरक्षा सुविधा पुरविण्यात यावी, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने गुरूवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे़

आयएमएचे १२०० डॉक्टर बेमुदत संपावर
लातूर : डॉक्टरावर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ व सरकारने डॉक्टरांना योग्य ती सुरक्षा सुविधा पुरविण्यात यावी, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने गुरूवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे़ परिणामी जिल्ह्यातील ११०० दवाखाने बंद राहिल्याने २० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची गैरसोय झाली़
शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ पुन्हा इंडियन मेडिकल असोसिएशनने संप आंदोलनास सुरूवात केली आहे़ सोमवारी जिल्ह्यातील सर्वच डॉक्टरांनी एक दिवसीय संप केला होता़ मात्र गुरूवारी मार्डच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित इंडियन मेडिकल असोसिएशनने बेमुदत संपास सुरूवात केली आहे़
लातूर शहरात इंडियन मेडिकल असोसिएशनचे जवळपास २५० तर जिल्ह्यात १२०० डॉक्टर सदस्य आहेत़ या डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे शहरातील २५० तर जिल्ह्यातील १ हजार १०० हॉस्पिटल बंद होते़ त्यामुळे विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना सेवा मिळाली नाही़ परिणामी, त्यांना शासकीय रुग्णालय, सर्वोपचारकडे धाव घ्यावी लागल्याचे पहावयास मिळाले़