शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

'मी सुद्धा फुकट जात नाही'; मौखिक परीक्षेसाठी पैसे मागणारे अधिष्ठाता सक्तीच्या रजेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 16:00 IST

शैक्षणिक क्षेत्रातील हा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर कुलगुरूंनी तातडीने केली कारवाई

ठळक मुद्देहा संशोधक विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण असून, मागील काही वर्षांपासून तासिका तत्त्वावर महाविद्यालयात नोकरी करीत आहे. बहिस्थ परीक्षकास ४० हजार रुपये आणि राहणे, जेवणासाठी २० हजार रुपये असे एकूण ६० हजार रुपयांची केली मागणी पैसे मिळाले नसल्यामुळे तीनही वेळा व्हायवा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

औरंगाबाद :  स्वत:च्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे काम पूर्ण झालेल्या संशोधक विद्यार्थ्यास अंतिम मौखिक परीक्षेसाठी (व्हायवा) येणाऱ्या बहिस्थ परीक्षकास ४० हजार रुपये आणि राहणे, जेवणासाठी २० हजार रुपये असे एकूण ६० हजार रुपये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असलेल्या सामाजिकशास्त्राच्या अधिष्ठातांनीच मागितल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत' ने उघडकीस आणला होता. शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडालेल्या या प्रकाराची गंभीर दखल कुलगुरू प्रमोद येवले यांनी घेतली असून अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांना सोमवारी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

काय आहे प्रकरण : विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील एका विद्यार्थ्याने पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करीत शोधप्रबंध ४ जून २०१८ रोजी विद्यापीठाला सादर केला. विद्यापीठाने हा प्रबंध मू्ल्यांकनासाठी परभणी आणि इतर ठिकाणच्या एका प्राध्यापकाकडे पाठविला. मार्गदर्शक तथा अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह इतर दोन जणांनी मूल्यांकन करून अहवाल विद्यापीठास पाठविला. तिन्ही अहवाल आल्यानंतर आठ दिवसांच्या आत दोन बहिस्थ परीक्षकांपैकी एकाला अंतिम मौखिक परीक्षेसाठी बोलावण्यात येते. विद्यापीठाच्या नियमानुसार ५०० किलोमीटरच्या आतील अंतरात असलेल्या परीक्षकाला बोलावले जाते. त्या परीक्षकास विद्यापीठ  गाडीभाडे, भत्ता देते. त्यामुळे विद्यार्थ्याकडून पैसे मागणे  नियमबाह्य असते. मात्र, राज्यशास्त्र विभागातील या विद्यार्थ्याचा परभणी जिल्ह्यातील बहिस्थ परीक्षकाची वेळ तीन वेळा घेण्यात आली. मात्र, पैसे मिळाले नसल्यामुळे तीनही वेळा व्हायवा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

निर्णय विद्यापीठाने घ्यावा; संशोधक विद्यार्थ्याचा निश्चयहा संशोधक विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण असून, मागील काही वर्षांपासून तासिका तत्त्वावर महाविद्यालयात नोकरी करीत आहे. याठिकाणी सरासरी आठ हजार रुपये मिळत असल्याची माहितीही ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे. या तुटपुंज्या पगारात घर चालवणे शक्य होत नाही, त्यामुळे एकही रुपया लागत नसलेल्या व्हायवासाठी ६० हजार रुपये कोठून आणायचे, असा प्रश्न पडल्यामुळे विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवीचा विषयच बंद केला. जो काही निर्णय विद्यापीठाला घ्यायचा आहे ते घेतील, असेही संबंधित विद्यार्थ्याने ठरवून टाकले आहे.

संशोधक विद्यार्थी आणि अधिष्ठातांमधील संवाद : पहिली क्लिपविद्यार्थी : सर, व्हायवाची तारीख मिळाली का?अधिष्ठाता : नाही.विद्यार्थी : तुम्हाला भेटायला यावं म्हणतोय. पुढची डेट घेण्यासाठी.अधिष्ठाता : या ना मग.विद्यार्थी : कधी येऊ?अधिष्ठाता :  कधीही या. तुम्ही याल तेव्हा बोलेल त्यांच्याशी.(एक्सटर्नल रेफ्रिशी) विद्यार्थी : उद्या येऊ का?अधिष्ठाता : उद्या १२ तारीख. असं  करा सोमवारी या.विद्यार्थी : सोमवारी येणे कठीण आहे सर.अधिष्ठाता : उद्या येता मग? त्यांना विचारावे लागेल डेटविषयी; पण डेटपेक्षा त्यांची व्यवस्था करावी लागेल तुम्हाला (पैशाची).विद्यार्थी : सर व्यवस्था करू ना.अधिष्ठाता : व्यवस्था पहिले करून घ्या ना.विद्यार्थी : करतो ना सर.अधिष्ठाता : पहिले व्यवस्था करा. ते घेऊन या. (पैसे) मग मी बोलतो त्यांच्याशी.विद्यार्थी : सर, केवळ त्याच्यामुळंच लांबतय का?अधिष्ठाता : मला तर तसंच वाटतंय.विद्यार्थी : तेवढे ४० हजार फार होतायत ना सर... हॅलो... हॅलो... सर माझी तडजोड सुरू आहे. पैसे इकडून तिकडून बघत आहे. अजून या महिन्याचा पगार झाला नाही. दुस-यांकडून घेणं, विचारणं सुरू आहे. डेट वगैरे मिळाली. फायनल झाली असती तर काही करता आलं असतं.अधिष्ठाता : मला यावर जास्त बोलता येत नाही. माझं काम संपलेलं आहे. यापलीकडं माझं काम नाही. काय ते तुम्ही पाहा.

दुसरी क्लिपअधिष्ठाता : तुम्ही माझ्याकडे या. तुमचंच काम आहे. माझं नाही.विद्यार्थी : माझंच काम आहे. बरोबर आहे आणि सर त्यात काही कमी होणार नाही का?अधिष्ठाता : तुमच्याकडे किती आहेत सध्या?विद्यार्थी :  दहा-पंधरा हजार रुपयांपर्यंत आहेत.अधिष्ठाता : तुम्ही एक काम करता. सध्या तुम्ही वीस हजार आणून द्या. बाकीचे मी टाकतो. नंतर तुमच्या पद्धतीने मला द्या.विद्यार्थी : सर आता १५ हजार रुपये आहेत.अधिष्ठाता : १५ नाही. २० हजार रुपये द्या. उर्वरित मी टाकत आहे. यापेक्षा अधिक मदत मी काय करू शकतो. तुम्ही तरी सांगा. आधीच खूप व्हायवा लांबलेला आहे. माझ्या डोक्याला ताप आहे. तो तरी कमी होईल.

तिसरी क्लिपअधिष्ठाता : मला माहीत आहे. सगळ्यांना द्यावेच लागतात. तो माणूस येतो (रेफ्री) एक दिवस घालवतो. थेसिस वाचून रिपोर्ट पाठवतो. त्यामुळे त्याला पैसे देणे अपेक्षितच आहे. आता सगळीकडेच हे सुरू आहे. आम्हीही बाहेर जात असतो. सगळ्यांनाच अपेक्षित असते.विद्यार्थी : सर पाच-सात हजार होते का ते बघा ना.अधिष्ठाता : नाही होत हो आता. विद्यार्थी : तुम्हाला रिक्वेस्ट करतो आता. तुम्हाला  गिफ्ट देतो.अधिष्ठाता : मला रिक्वेस्ट करून काय फायदा हो. (मोठ्याने हसतात अन विद्यार्थी विनंती करतो) मला  गिफ्ट नको हो. मीसुद्धा बाहेर गेल्यावर घेतो ना. मी काही फुकट जात नाही ना.(संशोधक विद्यार्थी आणि अधिष्ठाता यांच्या संवादाच्या एकूण सहा ऑडिओ क्लिप ‘लोकमत’ला प्राप्त झाल्या आहेत.) 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीMONEYपैसाAurangabadऔरंगाबाद