शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

'मी बनावट नव्हे हाडाचा शेतकरी '; शेतकरी आंदोलन प्रश्नांवर रावसाहेब दानवेंनी पळ काढला 

By सुमेध उघडे | Updated: December 15, 2020 16:47 IST

Farmer Agitation at Delhi, Raosaheb Danve News माध्यमांमध्ये माझ्या विधानाचा विपर्यास झाला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या आंदोलनात पाकिस्तानचा हात कसा ? कृषी कायद्याचे फायदे सांगितले पण प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत

औरंगाबाद : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन, पाकिस्तानचा आहे असे वक्तव्य करून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सनसनाटी निर्माण केली होती. या विधानानंतर त्यांच्यावर सर्वस्तरातून  टीकाटिपण्णी सुरु आहे. मंगळवारी एका पत्रकार परिषदेत हाच धागा पकडून पाकिस्तान आणि चीनचा शेतकरी आंदोलनात हात कसा ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता दानवे यांनी, 'मी बनावट नव्हे, हाडाचा शेतकरी. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्यानंतर मी काय बोलू ?'  असे बोलून पत्रकार परिषदेतून पळ काढला. पत्रकार प्रश्न विचारात होते आणि दानवे उठून निघून जात होते असे चित्र पत्रकार परिषदेत होते. 

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विषय तापला असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यात एका आरोग्य केंद्राच्या उदघाटनावेळी धक्कादायक विधान केलं होते. दानवे यांनी "आता जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये मुस्लिम समाजाला उचवलं गेलं आणि सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुस्लिम नागरिक बाहेर गेला का?", असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडले होते.

मंगळवारी रावसाहेब दानवे औरंगाबाद येथे शेतकरी कायद्यावर एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. सुरुवातीला दानवे यांनी नवे कृषी कायदे समजावून सांगितले. यानंतर सर्व पत्रकारांना एकाच वेळी प्रश्र्न विचारायला लावले.  पत्रकारांनी शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात आहे या विधानावर प्रश्न विचारले. यावर दानवेंनी  माध्यमांमध्ये माझ्या विधानाचा विपर्यास झाला. मी बनावट नव्हे, हाडाचा शेतकरी आहे इतकेच उत्तरे देत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. पत्रकार प्रश्र्न विचारत होते आणि रावसाहेब दानवे उठून निघून जात होते. पत्रकारांनी नेमका विपर्यास काय झाला ते तरी सांगा असेही विचारले मात्र दानवे न थांबता निघून गेले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद