अवैधरित्या २२ टन मांस नेणारा ट्रक पकडला
By Admin | Updated: July 18, 2014 01:51 IST2014-07-18T00:48:54+5:302014-07-18T01:51:38+5:30
हिंगोली : अवैधरित्या २२ टन मांस वाहून नेत असलेला ट्रक शहर पोलिसांनी १७ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास शहरातील नांदेड नाक्यावर पकडला.

अवैधरित्या २२ टन मांस नेणारा ट्रक पकडला
हिंगोली : अवैधरित्या २२ टन मांस वाहून नेत असलेला ट्रक शहर पोलिसांनी १७ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास शहरातील नांदेड नाक्यावर पकडला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.
एक ट्रक नागपूरकडे मांस घेऊन निघाला असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, उपअधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सतीशकुमार टाक, फौजदार सोनवणे यांच्या पथकाने नांदेड नाक्यावर सापळा लावला. या कारवाईत ट्रक क्र. एम. एच. ३१ डी. एस. - १३९३ मधून अवैधरित्या मांस नेताना सदरील वाहन पकडण्यात आले. या प्रकरणी फौजदार विवेक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहंमद वसीम मो. शमी, भोजराव प्रभाकर खवसे, एकबाल काशीद इस्माईलखाँ पठाण, एजास अहमद अ. समद कुरेशी, असीफ कुरेशी (सर्व रा. नागपूर) यांच्याविरूद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी मोहंमद वसीम मो. शमी, भोजराव प्रभाकर खवसे, एकबाल काशीद इस्माईलखाँ पठाण या तिघांना अटक करण्यात आली आहे. शहर पोलिस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)