अवैध वाहतूकदारांची बसस्थानकात घुसखोरी...!
By Admin | Updated: March 31, 2016 00:23 IST2016-03-31T00:13:08+5:302016-03-31T00:23:03+5:30
अमोल राऊत , मंठा बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खाजगी वाहनांना मनाई करण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.

अवैध वाहतूकदारांची बसस्थानकात घुसखोरी...!
अमोल राऊत , मंठा
बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खाजगी वाहनांना मनाई करण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. मात्र, बसस्थानक व परिसरात खाजगी प्रवासी वाहनधारक चक्क बस स्थानकाच्या आवारात घुसत सर्रास प्रवासी पळवत असल्याचे चित्र लोकमतने बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.
खाजगी प्रवासी वाहतुकीमुळे महामंडळाला वर्षाला २२५ कोेटींचा फटक ा सहन क रावा लागत असल्याची बाब समोर आल्याचे गांभीर्याने घेत , उच्च न्यायालयाने ८ फेबु्रवारी २०१६ रोजी बस स्थानकाच्या २०० मीटर परिसरातील खाजगी वाहनांना मनाई करण्याचे आदेश सरकारला दिले. तसेच नियम तोडल्यास संबंधित वाहनांचे परमिट रद्द क रा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. मात्र, मंठा शहरात या आदेशाची दररोज पायमल्ली के ली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकीकडे एसटी महामंडळ दिवसेंदिवस तोट्यात जात असताना खाजगी वाहने व प्रवासी वाहने बस स्थानकाच्या प्रवेशव्दाराच्या समोर व बसस्थानकाच्या आवारात घुसत प्रवासी पळवताना दिसत आहे. बस स्थानक व परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर क ोणतीच कारवाई होत नसल्याने खाजगी प्रवासी वाहतूक धारक ांची मक्तेदारी गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे.
स्थानकातच खाजगी वाहने!
स्थानकाच्या २०० मीटर परिसरात खाजगी वाहनांना मनाई असतानाही बसस्थानकातच मोठ्या प्रमाणात खाजगी वाहने दिसून येतात. महामंडाळाचे प्रवासी हे खाजगी चालक पळवित असताना वाहतूक नियंत्रकांची सुध्दा त्यास मूक संमती असल्याचे दिसून येते. याबाबत पोलिस निरीक्षक देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.