मांसाची अवैधरित्या वाहतूक
By Admin | Updated: August 21, 2014 23:20 IST2014-08-21T21:26:33+5:302014-08-21T23:20:35+5:30
हिंगोली : अवैधरित्या गुरांच्या मांसाची वाहतूक करीत असलेला ट्रक २१ आॅगस्ट रोजी सकाळी १०.२० वाजता शहरातील एसआरपीएफ कॅम्पसमोर पकडण्यात आला.

मांसाची अवैधरित्या वाहतूक
हिंगोली : अवैधरित्या गुरांच्या मांसाची वाहतूक करीत असलेला ट्रक २१ आॅगस्ट रोजी सकाळी १०.२० वाजता शहरातील एसआरपीएफ कॅम्पसमोर पकडण्यात आला. या प्रकरणी पाच आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.
एका ट्रकमधून अवैधरित्या मांस नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हिंगोली शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, निरीक्षक सतीशकुमार टाक यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विवेक सोनवणे, पोकॉ प्रभाकर शेटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. नागपूरहून मुंबईकडे निघालेला ट्रक (क्र.एम.एच.३१ पी.क्यू.१८०७) पकडून पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये ५ लाख रूपये किंमतीचे मांस आढळून आले. या प्रकरणी पोकॉ प्रभाकर शेटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रोशन मोतीलाल पटेल, अन्सार अहमद अब्दुल गफूर, ट्रकमालक गफूर, महंमद वकील अली, अफसर हाजी (सर्व रा. नागपूर) यांच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात कलम ३२८, ४२९, ३४ भादंवि व प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ६ (१), (२), (क), (ख) ७९११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी रोशन मोतीलाल पटेल, अन्सार अहमद अब्दुल गफूर यांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक सोनवणे करीत आहेत.
१०० वाहनांवर केसेस
हिंगोली : शहरातील जिल्ह्यात अवैध वाहतुक करणारे व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी १९ आॅगस्ट रोजी १०० वाहनांवर केसेस करण्यात आल्या. वाहन चालकांवर कारवाईसाठी पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे. १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १०० वाहन चालकांवर केसेस करून त्यांच्याकडून १४ हजार ७०० रुपये दंडही वसूल झाला आहे.