ठाण्यासमोर टिच्चून चालते अवैध वाहतूक

By Admin | Updated: July 30, 2015 00:31 IST2015-07-30T00:31:02+5:302015-07-30T00:31:02+5:30

लातूर : शिवाजीचौक ते रेणापूर नाक्यापर्यंतचा अंबाजोगाई रोड वाहतुकीच्या विळख्यात सापडला आहे़ पोलिसांसमोरच शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोरच टिच्चून

Illegal traffic in front of Thane | ठाण्यासमोर टिच्चून चालते अवैध वाहतूक

ठाण्यासमोर टिच्चून चालते अवैध वाहतूक


लातूर : शिवाजीचौक ते रेणापूर नाक्यापर्यंतचा अंबाजोगाई रोड वाहतुकीच्या विळख्यात सापडला आहे़ पोलिसांसमोरच शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोरच टिच्चून प्रवासी भरत अवैध वाहने सुसाट वेगाने दामटली जातात़ विनानंबरप्लेट धावणारी वाहने वाहतूकशाखा व चार्ली पोलिसांच्याही आवाक्याबाहेर आहेत़ शिवाजी चौक, धर्मादाय आयुक्त कार्यालय, अल्पसंख्यांक महामंडळ, एसटी वर्कशॉप, परिवहन कार्यालय, जुना रेणापूरनाका, नवीन रेणापूर नाक्याच्या दोन्ही बाजूने बेशिस्त पार्कींगमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे़
नव्या बसस्थानकातून प्रवाशांची पळवापळवी केली जाते़ काही काळी-पिवळी वाहने जुना रेणापूर नाका येथे ग्राहकांच्या प्रतिक्षेत थांबत असल्याने चौकातील वाहतूकीची कोंडी होत आहे़ शिवाय नवीन रेणापूर नाक्यावर वाळूची अवैध वाहने अस्ताव्यस्त उभी राहत असल्याने वाहतूक ठप्प होते़
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारी बेशिस्त वाहतूक पोलिसांना नियंत्रीत करता येत नाही़ अधिकाऱ्यांच्या वाहनांनाही सुसाट वेगात ओव्हरटेक करणारे वाहनचालक कारवाईच्या कक्षेबाहेर राहतात़ अंबाजोगाई-रेणापूरकडून व शहरातून तसेच औशाकडून येणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर वर्दळ आहे. त्यात रस्त्यावर पार्किंग झालेल्या वाहनतळामुळे रहदारीला अडथळा होत आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर पोलिस अधीक्षकांचे कार्यालय आहे. तरीपण या रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
शिवाजी चौक ते रेणापूर नाका असलेल्या या प्रमुख रस्त्यावर मंगल कार्यालय, दोन महाविद्यालये, एस.पी. कार्यालय, बसस्थानक, वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी रुग्णालये आहेत. त्यामुळे वाहनधारकांची वर्दळ असते. परंतु, पोलिस वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष आहे.

Web Title: Illegal traffic in front of Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.