७० ब्रास वाळूचा अवैधरित्या साठा
By Admin | Updated: May 1, 2015 00:49 IST2015-05-01T00:45:40+5:302015-05-01T00:49:40+5:30
उमरगा : तालुक्यातील गुंजोटी येथे विनापरवाना ७० ब्रास वाळूचा साठा केल्या प्रकरणी तिघांविरूद्ध उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली आहे.

७० ब्रास वाळूचा अवैधरित्या साठा
उमरगा : तालुक्यातील गुंजोटी येथे विनापरवाना ७० ब्रास वाळूचा साठा केल्या प्रकरणी तिघांविरूद्ध उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली आहे. जवळपास ९ लाख २३ हजार रूपये इतका दंड आकरण्यात आला आहे. यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुंजोटी येथे मागील काही दिवसांपासून वाळूचा विनापरवाना साठा करून विक्री सुरू होती. याबाबत उपविभागाीय अधिकारी कार्यालयाकडे तक्रारीही येत होत्या. सदरील तक्रारींची दखल घेत संबंधित कार्यालयाच्या पथकाने गुरूवारी अचानक भेट देवून तपासणी केली असता शरणाप्पा गुरूसंतप्पा शिवनेचारी यांनी ४७ ब्रास वाळूचा विनापरवाना साठा केल्याचे समोर आले.
त्यावर प्रशासनाने संबंधितास ३ हजार २०० रूपये ब्रासप्रमाणे १ लाख ५० हजार ४०० रूपये दंड व त्याचे बाजारी किंमतीच्या तीन पट म्हणजेच ४ लाख ५१ हजार २०० रूपये आणि २०० रूपये ब्रासमुल्य असे एकूण ६ लाख ११ हजार इतकी रक्कम शासन खात्यावर तीन दिवसांत जमा करण्याबाबत आदेशित केले आहे. दरम्यान, गुंजोटी येथीलच माधव मुकंदा जोगदांडे यांनी १६ ब्रास वाळूचा साठा केल्याचे आढळून आले. त्यांना २ लाख ८ हजार रूपये दंड केला. तसेच संजय रघुनाथ सूर्यवंशी यांनी आठ ब्रास वाळू साठा केला होता. त्यांना १ लाख ४ हजार रूपये दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहर व परिसरातील अवैध वाळूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)