गहू, रॉकेलचा अवैध साठा जप्त

By Admin | Updated: March 20, 2017 23:49 IST2017-03-20T23:46:17+5:302017-03-20T23:49:16+5:30

नळदुर्ग : शासकीय वितरणासाठी असलेले ४५० लिटर निळे रॉकेल व ५० किलो वजनाचे गव्हाचे तब्बल ११३ पोते महसूलच्या पथकाने जप्त केले़

The illegal stocks of wheat, kerosene were seized | गहू, रॉकेलचा अवैध साठा जप्त

गहू, रॉकेलचा अवैध साठा जप्त

नळदुर्ग : शासकीय वितरणासाठी असलेले ४५० लिटर निळे रॉकेल व ५० किलो वजनाचे गव्हाचे तब्बल ११३ पोते महसूलच्या पथकाने जप्त केले़ परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे ही कारवाई केली़ यावेळी जवळपास पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील एका इसमाने स्वस्तधान्य दुकानात वितरित करण्यासाठी आलेल्या मालाची अवैधरित्या साठवणूक करून ठेवल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती़ या माहितीवरून परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात सोमवारी दुपारी इटकळ शिवारातील गट क्रमांक ५२ मधील कचरू फतरू पठाण यांच्या घराजवळ एका टेम्पोवर (क्ऱएम़एच़०७- ४२१४) कारवाई केली़
त्यावेळी टेम्पोमध्ये २ बॅरेलमध्ये ४०० लिटर निळे रॉकेल आढळून आले़ तर टेम्पो शेजारी ५ लिटरचे रॉकेलचे माप, ५० लिटर रॉकेलने भरलेले ५० लिटरचे कॅन, रॉकेल मोजणारी मोजपट्टी, २७ रिकामे बॅरल आढळून आले़ त्यानंतर घराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पथकाने तपासणी केली असता आतमध्ये ५० किलो वजनाचे ११३ पोते गहू (५६़५० क्विंटल) आढळून आला़ यातील ५६ पोते गहू हा शासकीय योजनेच्या पोत्यामध्ये तर उर्वरित ५७ पोते गहू हा अन्य पोत्यामध्ये भरून काळ्याबाजारात विक्रीसाठी अनधिकृतरित्या साठवून ठेवल्याचे आढळून आले़
पथकाने कारवाई केलेला टेम्पोचा मालक रजाक कचरू पठाण हा असून, या प्रकरणी तहसीलदार दिनेश झांपले यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़ महसूलच्या या कारवाईमुळे एकच स्वस्तधान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ या कारवाईवेळी आयुष प्रसाद यांच्या समवेत उस्मानाबादचे नायब तहसीलदार राजेश जाधव, इटकळ येथील मंडळ अधिकारी शिंदे, पोउपनि अनिल किरवाडे, पोना मनोज भिसे, आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)

Web Title: The illegal stocks of wheat, kerosene were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.