बेकायदा सावकारी; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: April 7, 2015 01:22 IST2015-04-07T00:57:21+5:302015-04-07T01:22:11+5:30

तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील ज्ञानेश्वर बाबूराव राजमाने यांनी होर्टी येथील सर्वे नं. १०५ मधील १ हेक्टर ९३ आर जमीन भारतबाई गणपतराव नकाते यांना

Illegal moneylenders; Crime against a couple | बेकायदा सावकारी; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

बेकायदा सावकारी; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा



तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील ज्ञानेश्वर बाबूराव राजमाने यांनी होर्टी येथील सर्वे नं. १०५ मधील १ हेक्टर ९३ आर जमीन भारतबाई गणपतराव नकाते यांना २ लाख ५० हजार रुपयात १३ जून २००३ रोजी खरेदी खत करून दिलेली आहे. दरम्यानच्या काळात ज्ञानेश्वर राजमाने यांनी आपण खाजगी सावकारी रकमेपोटी जमीन गहाणखत करून दिली असून, त्या बदल्यात भारतबाई नकाते यांना ५ लाख रुपये परत दिलेले असताना जमीन परत मिळत नसल्याची तक्रार संबंधित प्राधीकरणाकडे केलेली होती.
यावरून तहसीलदार, सपोनि व सहायक्क निबंधकामार्फत चौकशी होऊन खाजगी सावकारी झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सोमवारी नितीन शाहू मस्के (सहायक निबंधक सहकारी संस्था श्रेणी-१) यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून भारतबाई गणपतराव नकाते, दयानंद भगवानराव गुळवे (दोघेही रा. होर्टी, ता. तुळजापूर) यांच्या विरोधात नळदुर्ग पोलिसात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम ३९ अन्वये गुन्हा नोंद झाला. (वार्ताहर)

Web Title: Illegal moneylenders; Crime against a couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.