गारगोटी दगडाची बेकायदा वाहतूक
By Admin | Updated: May 22, 2015 00:31 IST2015-05-22T00:15:39+5:302015-05-22T00:31:00+5:30
चंदनझिरा : गौणखनिजांमधील एक प्रकार असलेला गारगोटी दगडाची बेकायदेशीर विक्रीकरीता वाहतूक करणारा ट्रक महसूल शाखा व पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरूवारी चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पकडला

गारगोटी दगडाची बेकायदा वाहतूक
चंदनझिरा : गौणखनिजांमधील एक प्रकार असलेला गारगोटी दगडाची बेकायदेशीर विक्रीकरीता वाहतूक करणारा ट्रक महसूल शाखा व पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरूवारी चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पकडला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पाच टन गारगोटी दगडासह ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.
एम.एच.१३ जी, १०७३ या क्रमांकाच्या ट्रकमधून गारगोटी दगडाची वाहतूक होत असल्याची माहिती कळताच जालना तहसील कार्यालयातील तलाठी शंकर आरकटी, पोलिस उपनिरीक्षक नितीन पाटील यांनी सापळा रचला. नवीन मोंढ्याजवळून हा ट्रक जाताना या पथकाने ट्रक पकडला व त्यातील सय्यद लियाकत सय्यद ईस्माईल (वय ३५, नॅशनलनगर), उत्तम कारभारी वाघ (वय ६०, रा. गोंदेगाव) या दोघांना ताब्यात घेतले. ट्रकसह माल जप्त केला. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक पाटील हे करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार पुष्पा सूर्यवंशी यांनी दिली.