महामार्गावर अवैध दारुविक्री थांबेना!
By Admin | Updated: June 16, 2017 00:54 IST2017-06-16T00:53:45+5:302017-06-16T00:54:30+5:30
जालना : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतील दारू दुकाने, परमीटर रूम शासनाने बंद केले आहेत. परंतु जिल्ह्यात महामार्गावर दारूची चोरटी वाहतूक वाढली आहे.

महामार्गावर अवैध दारुविक्री थांबेना!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतील दारू दुकाने, परमीटर रूम शासनाने बंद केले आहेत. परंतु जिल्ह्यात महामार्गावर रात्री-बेरात्री दारूची चोरटी वाहतूक व विक्री वाढली आहे. पोलिसांनी केलल्या विविध कारवायांमध्ये महिनाभरात सुमारे पंधरा लाखांची अवैध देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
महामार्गावर पाचशे मीटरच्या आत असणारे परमीट रुम, वाईन शॉप, बीयरशॉपी, देशी दारूचे दुकाने हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या महामार्गावर असणार १३९ परमीट रुम, दोन वाईन शॉप, ३८ बियर शॉपी व ३८ देशी दारूची दुकाने बंद केली आहेत. महामार्गावर अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांमार्फत कारवाया केल्या जात आहे. मात्र, दारू विक्रेते कधी खाजगी प्रवासी वाहनांमधून तर कधी दुचाकींवर रात्री-बेरात्री दारूची वाहतूक करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी एप्रिल व मे महिन्यात १०९ कारवायांमध्ये सहा लाख दहा हजारांची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे.