अवैध सावकाराच्या घरावर छापे!
By Admin | Updated: October 22, 2016 00:29 IST2016-10-22T00:12:27+5:302016-10-22T00:29:12+5:30
अंबड : अवैध सावकारी करीत असल्याच्या तक्रारीवरून अंबड येथील सहाय्यक निबंधक तुळशीराम भोजने आणि कर्मचाऱ्यांनी निळकंठ जानकीराम सुरंगे याच्या घराची शुक्रवारी झडती घेतली.

अवैध सावकाराच्या घरावर छापे!
अंबड : अवैध सावकारी करीत असल्याच्या तक्रारीवरून अंबड येथील सहाय्यक निबंधक तुळशीराम भोजने आणि कर्मचाऱ्यांनी निळकंठ जानकीराम सुरंगे याच्या घराची शुक्रवारी झडती घेतली. यात अनेक आक्षेपार्ह कागदपत्र आढळून आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
अंबड येथे भोजने हे अवैध सावकारी करीत असल्याच्या तक्रारी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे आल्या होत्या. यावरून सहाय्यक निबंधक कार्यालयाने सुरंगे याला नोटीस पाठवून सावकारी संदर्भात आक्षेपार्ह कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते. परंतु सुरंगे यांनी कागदपत्र सादर न केल्याने शुक्रवारी सहाय्यक निबंधक भोजने यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सुरंगे याच्या घराची शुक्रवारी तपासणी केली असता त्यात अनेक आक्षेपार्ह कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. सुरंगे याला सोमवारी नोटीस देऊन आपले मत मांडण्याची संधी दिली जाईल. काही आक्षेपार्ह कागदपत्र आढळून आल्यास संबंधितावर गुन्हे दाखल केले जातील, असे भोजने यांनी सांगितले.