अवैध देशी दारू पकडली
By Admin | Updated: June 27, 2014 00:08 IST2014-06-26T23:33:47+5:302014-06-27T00:08:05+5:30
पालम : तालुक्यातील शेख राजूर रस्त्यावर पांदण रस्त्यालगत लपून ठेवलेली देशी दारू पोलिसांनी २५ जून रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पकडली आहे.

अवैध देशी दारू पकडली
पालम : तालुक्यातील शेख राजूर रस्त्यावर पांदण रस्त्यालगत लपून ठेवलेली देशी दारू पोलिसांनी २५ जून रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पकडली आहे. पालम पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यात अवैधरित्या देशी दारुचा सुळसुळाट झाला आहे. पालम ते शेख राजूर या रस्त्यावर पांदण रस्त्यालगत कापसाच्या पराटीच्या ढिगाखाली अवैधरित्या विनापरवाना देशी दारुची विक्री करण्यासाठी १७ बॉक्स लपून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सापळा रचला. २५ जून रोजी मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पराटीच्या ढिगाखाली १७ बॉक्स याची किंमत ३० हजार ७२० रुपयांचा माल सापडला आहे. ही देशी दारू कोणी ठेवली याचा शोध घेतला जात आहे. पालम पोलिस ठाण्यात फिर्यादी सहाय्यक पोलिस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा पुढील तपास बीट जमादार भारत केंद्रे, पोलिस कर्मचारी दीपक जाधव हे करीत आहेत. (प्रतिनिधी)