ग्रामसभेत अवैध दारुबंदीचा ठराव
By Admin | Updated: August 24, 2014 01:14 IST2014-08-24T01:09:11+5:302014-08-24T01:14:44+5:30
शेवाळा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे सरपंच मणकर्णाबाई रणखांब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेवून गावातील अवैध दारुविक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला.

ग्रामसभेत अवैध दारुबंदीचा ठराव
शेवाळा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे सरपंच मणकर्णाबाई रणखांब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेवून गावातील अवैध दारुविक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला.
ग्रामसभेस उपसरपंच नय्युम पठाण, ग्रामविकास अधिकारी इंगोले, ग्रा.पं. सदस्य शंकर सावंत, माधवराव सावंत, विलास सावंत, प्रकाश नरवाडे, माजी सभापती रावसाहेब सावंत, माजी जि.प. सदस्य डॉ. अरुण सावंत, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव सुर्यवंशी, माधवराव सुर्यवंशी, शिवराम सुर्यवंशी, भगवान सुर्यवंशी, रामराव सावंत, निळकंठ सावंत, विश्वांभर सावंत, अमर सावंत, गंगाधर सावंत, अजय सावंत, आनंदराव सावंत, शरद सावंत, दिगांबर शेवाळकर आदी उपस्थित होते. गावात अवैध दारुविक्रीच्या व्यवसायामुळे भांडणतंटे चालू असल्याने ही दारुविक्री बंद करण्याबाबत ग्रामसभेत ठराव मांडण्यात आला.
विश्वांभर सावंत यांनी सुचक म्हणून तर निळकंठ सावंत यांने अनुमोदक म्हणून मांडलेला हा ठराव संमत करून त्याची प्रत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात देण्याचे ठरले. (वार्ताहर)