शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीने १०८ पैकी फक्त ३ रस्त्यांच्या कामांना दिली मुभा; गुणवत्ता पाहुण पुढील कामांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 17:36 IST

३१७ कोटी रुपये खर्च करून १०८ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे केली जाणार आहेत.

औरंगाबाद :आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी सोमवारी १०८ पैकी फक्त तीन रस्त्यांच्या कामांना मुभा दिली. मंगळवारी ही कामे सुरू होतील. कामाची गुणवत्ता तपासल्यानंतर उर्वरित कामांना हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि स्मार्ट सिटी प्रशासनाला सत्व परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

३१७ कोटी रुपये खर्च करून १०८ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे केली जाणार आहेत. या कामांच्या थर्ड पार्टी इन्स्पेक्शनसाठी ‘स्मार्ट सिटी’ ने मुंबई येथील आयआयटीशी करार केला आहे. आयआयटीचे प्रा.डॉ. धर्मवीर सिंह आपल्या सहकाऱ्यांसह शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ‘स्मार्ट सिटी’अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, स्नेहा बक्षी, अर्पिता शरद, पीएमसीचे समीर जोशी उपस्थित होते.

प्रा. डॉ. धर्मवीर सिंह म्हणाले, रस्त्यांच्या पाहणीच्यावेळी संबंधित कंत्राटदार आणि पीएमसीचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. त्यांना रस्त्यांच्या बांधणीबद्दल सूचना करण्यात आल्या. शहरात आतापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी आम्ही केली. स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये आणि पद्धतीत बदल करावा लागेल. ‘प्रत्येक पॅकेजमधील एक अशा तीन रस्त्यांची कामे उद्यापासूनच सुरू केली जातील.

या तीन रस्त्यांची निवडऔरंगपुरा ते नेहरू भवन, शारदा मंदिर आणि सरस्वती भुवन, भाग्यनगरचा रस्ता

मनपा अधिकारी कामांपासून दूरआयआयटीचे प्रा.डॉ. धर्मवीर सिंह यांच्यासोबत रस्त्यांची पाहणी करताना ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अभियंत्यांना बोलावलेच नाही. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर महापालिकेकडेच रस्ते हस्तांतरित करावे लागणार आहेत, त्यामुळे पाहणीच्या वेळी पालिकेचे अभियंते असणे आवश्यक होते, असे मानले जात आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाIIT Mumbaiआयआयटी मुंबई