‘आयआयएम’ केंद्र औरंगाबादला हवे!
By Admin | Updated: July 13, 2014 00:45 IST2014-07-13T00:41:01+5:302014-07-13T00:45:49+5:30
औरंगाबाद : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रियल अँड अॅग्रिकल्चर (सीएमआय) नेहमीच अग्रेसर असते.

‘आयआयएम’ केंद्र औरंगाबादला हवे!
औरंगाबाद : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रियल अँड अॅग्रिकल्चर (सीएमआय) नेहमीच अग्रेसर असते. केंद्र शासनाने दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात पाच इंडियन इन्स्टिट्यूटचे केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच सीएमआयएने हे केंद्र औरंगाबादेत सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
आयआयटी आणि आयआयएमचे केंद्र औरंगाबादेत सुरू करावे यासाठी सीएमआयए अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. आयआयएमचे केंद्र पुण्यात उघडण्यासाठी पन्नास एकर जागा मिळणार नाही. त्यापेक्षा औरंगाबादेत हे केंद्र सुरू केल्यास शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भर पडेल.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पाठविलेल्या एका पत्रात सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी म्हटले आहे की, पन्नास वर्षे जुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शहरात आहे. याशिवाय इंडो जर्मन टूल रूम, सीपेट, मराठवाडा आॅटो क्लटरसह अनेक जमेच्या बाजू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डीएमआयसी प्रकल्पही औरंगाबादेत असून, या दृष्टीने कामही सुरू झाले आहे. शहराची गरज लक्षात घेऊन आयआयएमचे केंद्र शहराला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.