रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्गाकडे पुन्हा दुर्लक्ष
By Admin | Updated: June 12, 2016 00:04 IST2016-06-11T23:58:58+5:302016-06-12T00:04:31+5:30
औरंगाबाद : रोटेगाव-पुणतांबा या जुन्या प्रस्तावित मार्गाऐवजी रोटेगाव-कोपरगाव कॉडलाईनचा प्रस्ताव रेल्वेला पाठविण्यात आला होता.

रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्गाकडे पुन्हा दुर्लक्ष
औरंगाबाद : रोटेगाव-पुणतांबा या जुन्या प्रस्तावित मार्गाऐवजी रोटेगाव-कोपरगाव कॉडलाईनचा प्रस्ताव रेल्वेला पाठविण्यात आला होता. या मार्गाच्या मंजुरीची प्रतीक्षा होत असताना पुन्हा एकदा रोटेगाव-पुणतांबा रेल्वे मार्गावरच रेल्वे प्रशासनाकडून भर दिला जात आहे. गेल्या २५ वर्षांपासून सर्वेक्षणाच्या गर्तेत असलेल्या या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी २.०५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
आजघडीला पुणतांबा, शिर्डीसाठी मनमाडमार्गे जावे लागते. त्यामुळे रोटेगाव ते पुणतांबा हे अंतर १२६ कि.मी. पडते. त्यामुळे हा प्रवास करताना अधिक वेळ लागतो. त्यामुळे रोटेगाव-पुणतांबा हा २७ कि. मी. चा रेल्वेमार्ग करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या २५ वर्षांपासून मागणी होत असलेल्या या रेल्वे मार्गात गोदावरी नदी येते. त्यामुळे हा रेल्वे मार्ग तयार करणे रेल्वेसाठी खर्चीक ठरत आहे. यावर पर्याय म्हणून रोटेगाव-कोपरगाव असा ३५ कि.मी.चा कॉडलाईनचा पर्याय मांडण्यात आला. या पर्यायी मार्गामुळे रोटेगाव ते पुणतांबा हे अंतर ६९ कि.मी.ने कमी होणार आहे. या नव्या पर्यायाचा प्रस्ताव रेल्वेला पाठविण्यातही आला; परंतु अजूनही रोटेगाव-पुणतांबा रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणावर भर दिला जात आहे.