शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांपासून पळताय म्हणजे तुम्हीच चूक केलीये!; भाजपमधील राड्यावर शिरसाटांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:18 IST

"भाजपनेच जाणीवपूर्वक युती तोडली!" शिरसाटांनी पुरावे दाखवत भाजपच्या 'मोठ्या भावा'च्या भूमिकेवर उठवले प्रश्नचिन्ह.

छत्रपती संभाजीनगर: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप करत युती तुटण्यास त्यांनाच जबाबदार धरले. "भाजपने युती तोडण्याची धारणा आधीच केली होती, त्यांनी मुद्दाम खोड मारली आणि मुख्यमंत्र्यांचेही ऐकले नाही," असे खळबळजनक विधान शिरसाट यांनी यावेळी केले.

कार्यकर्त्यांपासून पळू नका! भाजप कार्यालयात झालेल्या राड्यावर भाष्य करताना शिरसाट म्हणाले की, "ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस पक्षाचे झेंडे घेऊन काम केले, त्यांना तुम्ही डावलू शकत नाही. जर तो उमेदवारी मागत असेल तर त्यात गैर काय? नेत्यांनी कार्यकर्त्यांना सामोरे गेले पाहिजे, त्यांच्याशी बोलले पाहिजे. तुम्ही त्यांच्यापासून पळ काढत असाल, तर तुमचीच चूक आहे." कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणे ही नेतृत्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

ठाकरे आणि राऊतांवर टीकास्त्र संजय राऊत यांच्या पैशांच्या आरोपांवर शिरसाट यांनी कडाडून टीका केली. "राऊतांना फक्त कोटींच्या गप्पांचे स्वप्न पडत आहे. यांनी लोकसभेत तिकिटे विकली, हे पक्ष विकायला निघालेले लोक आहेत," असा टोला त्यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरेंच्या सभेच्या कार्यपद्धतीवर बोलताना, "मुंबई तुमची प्रॉपर्टी नाही, ती सर्वांची आहे," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

विकास हाच अजेंडा "लोकांना तुमच्या राजकीय वादाशी काहीही देणं-घेणं नाही. त्यांना पाणी आणि रस्ते हवे आहेत. पाण्याचे श्रेय कोणीही घ्या, पण लोकांना पाणी मिळाले पाहिजे," असे म्हणत त्यांनी निवडणुकीचा मूळ मुद्दा विकासाचाच असल्याचे स्पष्ट केले. संभाजीनगरमध्ये आता युती होणे शक्य नसून, आता प्रयत्न करणे म्हणजे 'डोकेफोडी'चे काम असल्याचे म्हणत त्यांनी स्वबळाचा नारा अधिक गडद केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shirsat Slams BJP: Running from Workers Means You've Made a Mistake!

Web Summary : Minister Shirsat accused BJP leadership of breaking the alliance before the municipal elections, criticizing their handling of party workers. He emphasized development as the key issue and dismissed criticism from Raut and Thackeray.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Sanjay Shirsatसंजय शिरसाट