शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'पोलिसांत गेलात तर तुमचे गाडीसारखे हाल करेन'; ३ गाड्या ठोकून मद्यधुंद कारचालकाची अरेरावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 12:57 IST

आठ दिवसांत ‘हिट ॲण्ड रन’ची तिसरी घटना : मद्यधुंद कारचालकाने भर दुपारी उभ्या तीन गाड्या ठोकल्या, वाहनांचा अक्षरश: चक्काचूर

छत्रपती संभाजीनगर : एपीआय कॉर्नरकडून ठाकरेनगर, सिडको एन-२ च्या रस्त्याने भरधाव वेगात जाणाऱ्या मद्यधुंद कारचालकाने रविवारी दुपारी २:४५ वाजेच्या रस्त्याच्या बाजूला घरासमोर उभ्या तीन गाड्यांना ठोकले. गाडीचा वेग जास्त असल्याने तीन वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. मागील आठ दिवसांमध्ये ‘हिट ॲण्ड रन’ची तिसरी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कोडा कार (एमएच ४६ एक्स ४४७२) एपीआय कॉर्नर येथील पंपावर इंधन भरल्यानंतर सिडको एन-२ ठाकरेनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाली. काही अंतरावर मद्यधुंद कारचालकने गाडीचा वेग वाढवला. तेव्हा चालकाच्या बाजूने रस्त्याच्या कडेला उभ्या विलास राठोड यांच्या मालकीच्या फियाट कारला (एमएच ०२ बीवाय ७९८८) पाठीमागून जोराची धडक दिली. त्या धडकेमुळे उभी कार समोरील भिंतीवर आदळली. त्यात दोन्ही बाजूने गाडीचा चेंदामेंदा झाला. त्या गाडीला धडकल्यानंतर भरधाव कार डाव्या बाजूने जात ताराचंद कोल्हे यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीवर (एमएच २० सीएच ४३१३) जोरात आदळली. या धडकेत स्विप्ट गाडी समोरच्या झाडावर जाऊन आदळली. त्यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. 

ही धडक एवढी भीषण होती की, स्कोडा कारमधील एअर बॅग उघडल्या. त्यामुळे कारमधील पाच जण बचावले. त्याचवेळी भरधाव कारने रूपाली पाटील यांच्या ॲक्टिव्हाला (एमएच २० सीएम ११९६) धडक दिली. त्यात गाडीच्या पाठीमागील भागाचे नुकसान झाले. या अपघातानंतर भरधाव गाडीतील पाचजण खाली उतरले. त्यातील चौघेजण पळून गेले. मद्यधुंद गाडी मालक व चालक अविनाश कांतीलाल शिंदे (२२, रा. ५६ नंबर रेल्वे गेट, राजनगर, मुकुंदवाडी) यास नागरिकांनी पकडले. या प्रकरणी ताराचंद कोल्हे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुकुंदवाडी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

...तर तुमचे गाडीसारखे हाल करेनमद्यधुंद कारचालक गाडीतून खाली उतरल्यानंतर उपस्थित नागरिकांसह महिलांनाच धमकावत होता. पोलिसात तक्रार दिली तर जसे तुमच्या गाडीचे हाल झाले, तसे तुमचेही करेन. कुठेही तक्रार करू नका, तुमच्या गाडीची नुकसानभरपाई करून देतो, अशीही बडबड करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

गाडीसमोर झाड नसते तर...रस्त्याच्या कडेला उभ्या स्विफ्ट डिझायर गाडीच्या समोर माेठे झाड होते. त्या झाडाखाली तीन मुले खेळत होती. त्याचवेळी मनपाच्या नळाला पाणी आले म्हणून दोन-तीन महिला पाणी भरत होत्या. भरधाव गाडीने उभ्या गाडीला धडक दिल्यानंतर ती जोरात झाडावर आदळून त्याच ठिकाणी दोन्ही गाड्या अडकल्या. त्यामुळे झाडाखाली खेळणारे मुले बालंबाल बचावली. गाडीसमोर झाड नसते तर अनेकांना जीव गमवावा लागला असता, असेही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

पाइप जाळून पोलिसांचा निषेधघटनास्थळी मद्यधुंद चालक महिलांसह इतरांना अरेरावी करीत होता. तेव्हा नागरिकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांना येण्यास तब्बल दीड तास उशीर झाल्यामुळे माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे, सोमनाथ बोंबले यांच्यासह नागरिकांनी पेट्रोल टाकून रस्त्याच्या कडेला ठेवलेले पाइप पेटवून निषेध नोंदवला. त्याचवेळी त्या रस्त्यावर गतिरोधक उभारण्यासह अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी केली. घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. शेवटी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पांडुरंग डाके यांच्यासह पोलिस घटनास्थळी पोहोचत अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा केला.

आठ दिवसांतील घटना- २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता एका मद्यधुंद कारचालकाने आकाशवाणी चौकात सहा गाड्यांना धडक दिली. सिंधी कॉलनीत अंधारात गाडी उभी करून पळून गेला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली.- २८ सप्टेंबर रोजी निराला बाजार परिसरात पार्किंगमध्ये उभ्या आठ दुचाकींवर एका महिला कारचालकाने गाडी घातली. एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला.- २९ सप्टेंबर रोजी सिडको, एन-२ ठाकरेनगर भागात भरधाव कारचालकाने तीन वाहनांना धडक दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी