शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

दूध मागितले तर लगेच मिळते; परंतु पाण्यासाठी सातारा-देवळाईकरांचा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 19:20 IST

पाणीपुरवठ्याच्या टँकरसाठी आगाऊ रक्कम मोजली तरच तेही दिवसाआड येते. ३० दिवसांचे पैसे घेऊन १५ च दिवस पाणीपुरवठा मनपाकडून केला जातो.

औरंगाबाद : उन्हाचा पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअस पार करू लागला, तशा पाण्याच्या झळा देखील सातारा- देवळाईकरांना बसू लागल्या. बोअरवेलची पातळी बुडापर्यंत जाऊन पोहोचली. एक वेळेस दूधवाल्याला दूध मागितले तर तो लगेच देतो, परंतु पाण्याच्या जारची गाडी थांबवून ‘एक जार दे रे भाऊ’ म्हटले तरी शिल्लक नाही म्हणून तो निघून जातो, ही वस्तुस्थिती आहे.

शासनाच्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेतून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकणे तसेच जलकुंभ बांधण्याचे काम हाती घेतले असले तरी ‘घागर रिकामी रे गोविंदा’ असेच म्हणण्याची वेळ सातारा- देवळाईतील नागरिकांवर येऊन ठेपलेली आहे. पाणीपुरवठ्याच्या टँकरसाठी आगाऊ रक्कम मोजली तरच तेही दिवसाआड येते. ३० दिवसांचे पैसे घेऊन १५ च दिवस पाणीपुरवठा मनपाकडून केला जातो.

जारवाल्यांचीच चलती..चार पाहुणे घरी आले अन् पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी अधिकचा जार मागितला तर नकार दिला जातो. दूध एक वेळ त्वरित मिळते, परंतु जारवाला धुडकावून लावतो, याकडे कुणाचेही लक्ष नाही. सातारावासीयांना किमान जल दिनी तरी ‘पाणी पाजा हो’ असेच म्हणायची वेळ आली आहे.- अनंत सोन्नेकर

गरीब कुटुंबीयाला मनपाने मोफत पाणी द्यावे...सातारा- देवळाईतील बहुतांश कुटुंबे टँकरचे पाणी विकत घेऊ शकत नाहीत, अशा कुटुंबीयांना मनपाच्या वतीने मोफत पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. सर्वात जास्त महसूल याच परिसरातून घेतला जातो. अशा मजूर गरीब कुुटुंबाची तहान उन्हाळ्यात भागवावी, अशी मागणी आहे.- हरिभाऊ राठोड

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका