शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सूचना कागदावरच ठेवायच्या असतील तर बैठका घेता कशाला ? मनपा, महावितरणवर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:39 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शांतता समिती बैठकीत मनपा, महावितरणवर संताप

छत्रपती संभाजीनगर : जयंती उत्सव आले की शांतता समिती बैठकीत समाजबांधवांकडून सूचना घेतल्या जातात; पण महानगरपालिका, महावितरणकडून एकाही सूचनेची दखल घेतली जात नाही. उत्सवात ना पिण्याचे पाणी मिळते, ना महिलांसाठी मोबाइल टॉयलेटची सोय होते. ठिकठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत असतात. मिरवणूक मार्गावर अंधार असताे. तुम्हाला सूचना कागदावरच ठेवायच्या असतील, तर बैठका घेता कशाला, असा थेट प्रश्न करत आंबेडकरी अनुयायांनी मनपा, महावितरणच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी दुपारी पोलिस आयुक्तालयात शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जयंती उत्सवात एवढा जनसागर एकत्र येतो. मात्र, आजपर्यंत कधीही जयंती उत्सवाला गालबोट लागलेले नाही. यंदाचा जयंती उत्सवदेखील शांततेत, विविध सामाजिक कार्यक्रमांसह आदर्शवत असेल, असे आश्वासन समाजातील प्रमुख नेते व जयंती समितींनी पाेलिस प्रशासनाला दिले. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, शीलवंत नांदेडकर, प्रशांत स्वामी यांच्यासह समाजातील विविध नेते, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

नागरिकांकडून या प्रमुख सूचना :-क्रांती चौक ते भडकल गेट या मुख्य मिरवणूक मार्गावर फिरते शौचालय, पिण्याच्या पाण्याचे टँकर व रुग्णवाहिका असावी.-लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांची दुरुस्ती करून उंची वाढवावी.-मार्गावरील व्यापारी, विक्रेत्यांनी दुकान बंद केल्यानंतरही बाहेरील लाइट सुरू ठेवावे.-चिकलठाणा, टी.व्ही. सेंटर, आंबेडकर चाैक, नंदनवन कॉलनीत वाहतूक नियोजनासाठी पोलिस नियुक्त असावेत.-अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी. मिरवणुकीत मद्यपी आढळल्यास कठोर कारवाई करावी.-शनिवार, रविवारीदेखील परवाना एक खिडकी योजना सुरू ठेवावी.

पोलिसांच्या सूचना-कर्कश आवाजात डीजेवर आक्षेपार्ह गाणी वाजवू नयेत. पारंपरिक वाद्यांवर भर द्यावा.-कुठलीही बाब, सूचना नेत्यांनी सामंजस्याने घ्यावी. कार्यकर्त्यांना शांत राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.-वाहतुकीत अडथळा निर्माण होईल, असे स्टेज उभारू नका. वेळेची मर्यादा पाळावी.

आयुक्तांनी मनपा, महावितरणचे कान टोचलेबैठकीत प्रामुख्याने मनपा, महावितरणबाबतच सूचना केल्या गेल्या. मात्र, त्याची पूर्तता होत नसल्याने संतापही व्यक्त झाला. यावरून पोलिस आयुक्त पवार यांनी देखील मनपा, महावितरणचे कान टोचले. नागरिकांच्या सूचनांची अवहेलना होऊ देऊ नका. त्या गांभीर्याने घ्या. तुमच्या प्रत्येक सूचनेची पूर्तता होईल. मी स्वत: मनपा प्रशासक व महावितरणच्या प्रमुखांशी पत्रव्यवहार करून सर्व अडचणी दूर करतो, असे आश्वासन पवार यांनी उपस्थितांना दिले. दरम्यान, महावितरणतर्फे एकही अधिकारी बैठकीला उपस्थित नव्हता.

टॅग्स :dr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिस