शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

घरकुल पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांकडून करणार पैसे वसूल !

By विजय सरवदे | Updated: July 18, 2024 20:01 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६७ हजार घरकुले मंजूर : बांधली ४९ हजार ४४४ घरकुले

छत्रपती संभाजीनगर : घरकुल बांधकामासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने (डीआरडीए) पहिला हफ्ता जमा केला; पण काही लाभार्थ्यांनी घरकुल उभारण्याची सुरुवातही केलेली नाही. त्यांना गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांच्या माध्यमातून लवकरात लवकर घरकुल बांधकामाला सुरुवात करावी म्हणून नोटिसा दिल्या असून येत्या १५ दिवसांत घरकुल बांधकामाला सुरुवात न केल्यास पैसे परत करण्याचा निर्वाणीचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यात पंतप्रधान घरकुल योजना, रमाई घरकुल योजना आणि शबरी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. सन २०१६-१७ ते २०२३-२४ पर्यंत पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत ३६ हजार ७२ घरकुले मंजूर केली, रमाई घरकुल योजनेसाठी २६ हजार ६११, तर ‘शबरी’ योजनेमध्ये ४ हजार ५४६ घरकुलांना मंजुरी दिली. या तिन्ही योजनांत ६७ हजार २२९ घरकुले मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत ४९ हजार ४४४ घरकुले पूर्ण झाली आहेत. पहिला हप्ता घेतल्यानंतरही अद्याप ५ हजार ७२२ घरकुले उभारण्याकडे लाभार्थ्यांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे ‘डीआरडीए’ने एक तर घरकुले बांधा अथवा उचलेल्या हप्त्याचे पैसे जमा करा, असा पवित्रा घेतल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

किती घरकुलांना मंजुरी?प्रधानमंत्री आवास योजना : या योजनेंतर्गत ३६ हजार ७२ घरकुले मंजूर.रमाई आवास योजनेचे : या योजनेंतर्गत २६ हजार ६११ घरकुले मंजूर.शबरी आवास योजनेचे : या योजनेंतर्गत ४ हजार ५४६ घरकुले मंजूर.

पहिला, दुसरा हप्ता वाटपपंतप्रधान घरकुल योजना, रमाई घरकुल योजना आणि शबरी घरकुल योजनेत निवडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला व दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. अनेकांना तिसरा व चौथाही हप्ता दिला आहे.

साडेपाच हजार घरकुले अपूर्णपहिला हप्ता बँक खात्यात जमा झाल्यानंतरही पंतप्रधान घरकुल योजनेत ३ हजार ३६९, रमाई घरकुल योजनेत १ हजार ९८६ आणि शबरी घरकुल योजनेत ३६७ असे एकूण ५ हजार ७२२ घरकुले अपूर्ण आहेत.

१५ दिवसांत बांधकाम पूर्ण कराजुलैअखेरपर्यंत अपूर्ण घरकुलांची कामे पूर्ण करावीत, असे निर्देशन ‘डीआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना दिले आहेत.

...तर रक्कम वसूल केली जाणारयेत्या १५ दिवसांत घरकुलांचे बांधकाम सुरू न केल्यास लाभार्थ्यांकडून दिलेली रक्कम जमा करावी, अशा सूचना गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांना ‘डीआरडीए’ने दिल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद